मुंबई : राज्यात शिंदे फडणवीस सरकार येताच उद्योग परराज्यात जात असल्याचा आरोप सुरू आहेत. शिंदे सरकारच्या (Shinde Government) काळात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक गुजरातला गेली. हजारो रोजगारही गुजरात मध्ये गेले आहेत. नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी महाराष्ट्रातून पाच हजार कोटींचे गुंतवणूक उत्तर प्रदेश मध्ये घेऊन गेल्याचा आरोप सुरू झाला आहे.
![Jayant Patil tweeted](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-jayant-patil-on-shinde-fadanvis-gov_09012023151021_0901f_1673257221_646.jpg)
जयंत पाटलांची शिंदे- फडणवीसांवर खोचक टीका : सत्ताधाऱ्यांवर होणाऱ्या आरोपांवर, मनसेचे नेते राज ठाकरे यांना प्रसारमाध्यमांनी छेडले असता, एखाद दुसरा प्रकल्प गुजरात मध्ये गेल्याने काय फरक पडणार असल्याचे सांगत पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. राज्यात आरोपांवरून आरोप प्रत्यारोप सुरू असताना सोशल मीडियातून ही शिंदे फडणवीस सरकारवर (Jayant Patil criticize Shinde Fadnavis government) टीका केली जात आहे. गुंतवणूक गेल्याचे बॅनर्स फोटो आणि मीन्स देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी असाच फोटो शेअर करत शिंदे फडणवीस सरकारला घेरले आहे.
जयंत पाटील यांनी ट्विट केले : जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलेल्या ट्विटमध्ये तीन बॅनर दिसत आहेत. त्यापैकी बॅनरवर दूध मांगोगे तो दूध देंगे तर दुसऱ्या बॅनरवर खीर मांगोगे तो खीर देंगे असे लिहिलेले आहे. तिसऱ्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांचा फोटो असून इन्व्हेस्टमेंट मांगोगे, यूपी गुजरात को देंगे असे आशय लिहिल्याचे दिसून येत आहे. राज्यातून परराज्यात जाणाऱ्या उद्योगावरून पाटील यांनी हे ट्विट केले असून फोटोचा व शब्दांचा वास्तव्याशी संबंध असल्यास निव्वळ योगायोग समजावा अशी खोचक टीका देखील केली आहे.
विषयाला पुन्हा हात घातला : शिवसेनेतील फूट त्यानंतर शिंदे-फडणवीस युती सरकार आले. एकीकडे राज्यात राजकीय नाट्यावर पडदा पडल्यानंतर महाराष्ट्रात येणारे काही प्रकल्प गुजरातकडे गेले. यावरुन विरोधी पक्षांनी सरकारला वारंवार धारेवर धरलेले आहे. याच मुद्यावरुन आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विट करत पुन्हा एकदा या विषयाला हात घातला आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातकडे जात आहेत यावरुन शिंदे आणि फडणवीस सरकारला त्यांनी जोरदार टोले लगावले आहेत.तसेच, जयंत पाटलांच्या ट्विटमुळे राज्यभरात वेगवेळी राजकीय चर्चा सर्वत्र रंगली आहे.