मुंबई - हिंगणघाट घटनेनंतर भावना दुखावणे स्वाभाविक आहे. अशा मानसिकतेचा बिमोड करायला हवा. सरकार त्या नराधमाला योग्य शिक्षा देईल असे वक्तव्य जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. या घटनेनंतर भावनांचा उद्रेक झाला आहे. मात्र, जनतेने संयम बाळगून शांतता राखावी, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
ज्यांनी हे कृत्य केले आहे, त्याला शिक्षा व्हावी यासाठी कायदा कठोर केला पाहिजे. अशा नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी. न्यायाधीश त्याला जी शिक्षा देतील त्या शिक्षेसाठी त्याला जराही विलंब लागू नये. ही महाराष्ट्र सरकारची देखील भूमिका असल्याचे जयंत पाटील म्हणाले.