ETV Bharat / state

Jarandeshwar Sugar Mill Issue : जरंडेश्वर कारखान्यासाठी शालिनीताई मैदानात, उच्च न्यायालयात दाखल केली याचिका

Jarandeshwar Sugar Mill Issue : जरंडेश्वर साखर कारखाना ताब्यात घेण्यासाठी शालिनीताई पाटील (Shalinitai Patil) मैदानात उतरल्या आहेत. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.

Shalinitai
शालिनीताई मैदानात
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2023, 3:28 PM IST

मुंबई : (Jarandeshwar Sugar Mill Issue ) जरंडेश्वर साखर कारखान्याची किंमत 104 कोटी असताना गुरू कमोडिटीला कारखाना कवडीमोल भावात विकण्यात आला असून यात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करत या व्यवहाराला आव्हान देणारी रिट पिटीशन 6 सप्टेंबर रोजी शालिनीताईंनी दाखल केलीय. याची सुनावणी लवकरच खंडपीठासमोर होणार आहे. शालिनीताई या जरंडेश्वरच्या संस्थापक चेअरमन आहेत. म्हणून त्यांनी कारखान्यातील बेकायदा व्यवहाराला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचललं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.

बेकायदेशीर आर्थिक व्यवहार : गुरू कमोडिटी ही कंपनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची आहे. गुरू कमोडिटीने 2010 मध्ये हा साखर कारखाना 62 कोटी 75 लाखांना विकत घेतला. यामुळे ईडीने याबाबत तक्रार आल्यानंतर तपास केला होता. तेव्हा बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याचं निष्पन्न झालं होतं. यामुळे अजित पवार नाव देखील तक्रारीत होतं. मात्र 2021 मध्ये अजित पवारांचं नाव यातून वगळण्यात आलं. ही बाब त्यात नमूद केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे महाराष्ट्र सहकारी बँकेचे संचालक होते. तेव्हा काही लाख रुपयांचं वार्षिक उत्पन्न असलेल्या गुरू कमोडिटीज कंपनीला अब्जावधी रुपये किमतीचा जरंडेश्वर साखर कारखाना (Jarandeshwar Sugar Mill) बेकायदेशीरपणे विकण्यात आला. ज्या कंपनीची ऐपत चार आण्याची आहे, ती कंपनी शंभर रुपये किमतीचा कारखाना कसा विकत घेऊ शकते ? असा प्रश्न शालिनीताई पाटील यांनी याचिकेत केला आहे.

उच्च न्यायालयात याचिका दाखल : जरंडेश्वर कारखान्याच्या शालिनीताई पाटील स्वतः मूळ संस्थापक असल्याने, हा कारखाना मला ताब्यात मिळाला पाहिजे. याकरिता यातील बेकायदेशीर व्यवहाराबाबत चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचं देखील त्यांनी स्पष्टपणे नमूद केलयं. एकंदरीतच शालिनीताईंनी दाखल केलेल्या याचिकेमुळं आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

  1. Jarandeshwar Sugar Mill Issue : जरंडेश्वर साखर कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या; ईडी कडे मागणी
  2. Ajit Pawar On Jarandeshwar Case : जरंडेश्वर प्रकरणात क्लीन चिट नाही, चौकशी सुरू.. अजित पवारांकडून खुलासा
  3. जरंडेश्वर साखर कारखान्यावर इन्कम टॅक्सचा छापा: अजित पवारांच्या अडचणीत वाढ?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.