ETV Bharat / state

जम्मू-काश्मीरमधील शिवसेना नेत्यांचा जल्लोष; बाईक रॅली काढत वाटले लाडू

author img

By

Published : Nov 27, 2019, 11:41 PM IST

महाराष्ट्रात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होत आहे. त्याबद्दल जम्मूतील प्रेस क्‍लब परिसरात शिवसैनिकांनी जल्लोष केला. यावेळी, शिवसेनेचे जम्मू-काश्‍मीर प्रदेशाध्यक्ष मनीष साहनी यांच्या नेतृत्वाखाली शहरातून बाईक रॅली काढत लाडू वाटण्यात आले. रघुनाथ बाजार परिसरातून निघालेल्या या मिरवणुकीचा समारोप परेड परिसरात करण्यात आला.

sena
जम्मू-काश्मीरच्या शिवसेना नेत्यांचा जल्लोष

मुंबई - महाराष्ट्रात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होत आहे. त्याबद्दल जम्मू-काश्‍मीरमधील शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला आहे. जम्मूतील प्रेस क्‍लब परिसरात शिवसैनिकांनी जल्लोष केला.

जम्मू-काश्मीरच्या शिवसेना नेत्यांचा जल्लोष

यावेळी, शिवसेनेचे जम्मू-काश्‍मीर प्रदेशाध्यक्ष मनीष साहनी यांच्या नेतृत्वाखाली शहरातून बाईक रॅली काढत लाडू वाटण्यात आले. रघुनाथ बाजार येथून निघालेल्या या मिरवणुकीचा समारोप परेड परिसरात करण्यात आला. "भाजपने शिवसेनेची फसवणूक केली. मात्र, भाजपच्या अहंकाराला उद्धव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. आता उद्धव ठाकरे थेट मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत. जम्मू-काश्‍मीरमधील शिवसैनिकांना यामुळे आनंद झाला आहे" असे मत साहनी यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर शिवसैनिकांचा टरबूज फोडून जल्लोष

महाराष्ट्रातील शिवसेना नेते खासदार संजय राऊत, अनिल देसाई, एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे सत्ता मिळवणे शक्‍य झाल्याचे सहानी यांनी म्हटले आहे. मिळालेल्या यशासाठी त्यांनी या नेत्यांचे आभारही मानले आहेत. यावेळी, मीनाक्षी छिब्बर, अश्‍विनी गुप्ता, विकास बख्शी, राकेश गुप्ता, संजीव कोहली यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते

Intro:
मुंबई - महाराष्ट्रात शिवसेना पुरस्कृत सरकार बनत असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्रीपदावर विराजमान होत असल्याने जम्मू काश्मीर मध्ये जल्लोष करण्यात आला.जम्मू काश्मीर मधील शिवसेना नेत्यांनी लाडू वाटत बाईक रॅली काढून आपला आनंद व्यक्त केला.
 Body:प्रदेशाध्यक्ष मनीष साहनी यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी एकत्र येत प्रेस क्लब परिसरात मिठाई वाटत ढोल-ताश्यांच्या तालात मिरवणूक काढली. रघुनाथ बाजारातून ही मिरवणूक काढण्यात आली, यानंतर पुरानी मंडी परिसरात घोषणाबाजी करत परेड परिसरात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. महाराष्ट्रात सहा दशकं शिवसेनेने लोकांची सेवा केली आहे. मोठ्या अपेक्षेने शिवसेनेने भाजपसोबत महायुती केली होती. मात्र भाजपने शिवसेनेची फसवणूक केली.भाजपचा अहंकाराला उद्धव ठाकरेंनी चोख प्रतिउत्तर देत थेट मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत.भाजपला शिवसेनेचा हे सणसणीत उत्तर असून यामुळे जम्मू काश्मीर मधील शिवसैनिकाना अत्यानंद झाल्याचे साहनी यांनी सांगितले.
याचबरोबर राज्यातील प्रमुख नेते खासदार संजय राऊत,अनिल देसाई,एकनाथ शिंदे यांनी दिलेली झुंज आणि त्यांचा प्रयत्न यामुळे हे शक्य झाल्याचं सांगत त्यांनाही धन्यवाद देण्यात आले.यावेळी मिनाक्षी छिब्बर, अश्विनी गुप्ता ,विकास बख़्शी, राकेश गुप्ता, संजीव कोहली यांच्यासह शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.