ETV Bharat / state

अतिआत्मविश्वास नाही, पण आत्मविश्वास नक्की, मुख्यमंत्री होईन; फडणवीसांचा पुनरुच्चार - मुख्यमंत्री

यात अतिआत्मविश्वास नाही, पण आत्मविश्वास नक्की असून मीच मुख्यमंत्री होईन, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे या विधानानंतर नवीन चर्चांना तोंड फुटणार आहे. शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यशवंत चव्हाण सेंटरमध्ये वितरण करण्यात आले. त्यावेळी तो बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jul 27, 2019, 7:58 PM IST

Updated : Jul 27, 2019, 8:13 PM IST

मुंबई - शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पद कुणाकडे? असा संभ्रम कायम असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार आगामी काळात मीच मुख्यमंत्री होईन, असा पुनरुच्चार करून शिवसेनेला टोला लगावत आहेत. शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यशवंत चव्हाण सेंटरमध्ये वितरण करण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी आगामी काळाविषयीही भाष्य केले. यात अतिआत्मविश्वास नाही, पण आत्मविश्वास नक्की असून मीच मुख्यमंत्री होईन, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे या विधानानंतर नवीन चर्चांना तोंड फुटणार आहे.

अतिआत्मविश्वास नाही, पण आत्मविश्वास नक्की, मुख्यमंत्री होईन; फडणवीसांचा पुनरुच्चार

एकीकडे शिवसेनेकडूनही युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून लोकांपुढे आणले जात आहे तर, भाजपकडूनही मुख्यमंत्री पदावर दावा केला जात आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनी एका मंचावरून युतीचे शिक्कामोर्तब करताना वाटाघाटी बाबत...आमचं ठरलंय, असे सांगितले होते. मात्र. त्यानंतर दोन्ही पक्षाकडून सातत्याने मुख्यमंत्री पदाबाबत दावे केले जात असल्याने भाजप आणि शिवसेनेत आलबेल नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साप्ताहिक विवेकचे संपादक रमेश पतंगे आणि मार्मिकचे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांना उत्कृष्ट पत्रकारितेचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याबरोबरच माहिती आणि जनसंपर्क महासंचलनालयाने अधोरेखित केलेल्या विविध गटात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातल्या पत्रकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी माहिती आणि जनसंपर्क महासंचलनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंग, संचालक अजय आंबेकर यावेळी उपस्थित होते.

Intro:या बातमीसाठी live u वरून cm byte आयडी ने विसुअल्स आणि byte पाठवला आहे

अतिशयोक्ती नाही ,पण आत्मविश्वास नक्की आहे , मुख्यमंत्री होईन , फडणवीसांचा पुनरुच्चार

मुंबई २७

शिवसेना आणि भाजप मध्ये मुख्यमंत्री पद कुणाकडे ? असा संभ्रम कायम असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार आगामी काळात मीच मुख्यमंत्री होईन असा पुनरुच्चार करून शिवसेनेला टोला लगावत आहेत . शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यशवंत चव्हाण सेंटर मध्ये वितरण करण्यात आले . यावेळी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी आगामी काळाविषयी ही भाष्य केले . यात अति आत्मविश्वास नाही पण आत्मविश्वास नक्की असून मीच मुख्यमंत्री होईन असे म्हटले .

एकीकडे शिवसेनेकडूनही युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून लोकांपुढे आणले जात आहे . तर भाजपकडूनही मुख्यमंत्री पदावर दावा केला जातोय . शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनी एका मंचावरून युतीचे शिक्का मोर्तब करताना वाटाघाटी बाबत " आमचं ठरलंय " असे सांगितले होते . मात्र त्यांनतर दोन्ही पक्षाकडून सातत्याने मुख्यमंत्री पदाबाबत दावे केले जात असल्याने भाजप आणि शिवसेनेत आलबेल नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे .

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साप्ताहिक विवेकचे संपादक रमेश पतंगे आणि मार्मिकचे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांना उत्कृष्ट पत्रकारितेचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला . एक लाख रुपये आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे . त्या बरोबरच माहिती आणि जनसंपर्क महासंचलनालयाने ने अधोरेखित केलेल्या विविध गटात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातल्या पत्रकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले . यावेळी माहिती आणि जनसंपर्क महासंचलनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंग , संचालक अजय आंबेकर यावेळी उपस्तिथ होते . Body:....Conclusion:.....
Last Updated : Jul 27, 2019, 8:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.