ETV Bharat / state

आयटीआयची  प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरू; मात्र केंद्राच्या 'या' धोरणामुळे राज्यातील जागा घटल्या

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून राज्यातील सरकारी आणि खासगी आयटीआयमधील प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सोमवार 3 जूनपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात असलेल्या सरकारी आयटीआयमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल दोन हजाराहून अधिक प्रवेशाच्या जागा कमी झाल्या आहेत.

फोटो सौजन्य- डीव्हीईटी वेबसाईट
author img

By

Published : Jun 2, 2019, 7:10 PM IST

मुंबई- केंद्र सरकारने देशभरात कौशल्य विकासाचा मोठा गाजावाजा केला. मात्र, औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयसाठी नवीन इंटेक कॅपॅसिटी(पटसंख्या) धोरण आणल्यामुळे राज्यातील सरकारी आयटीआय मधील प्रवेशाच्या जागा मोठ्या प्रमाणात घटल्या आहेत. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात आयटीआयच्या प्रवेशाला मागणी असतानाही यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत अनेकांना प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून राज्यातील सरकारी आणि खासगी आयटीआयमधील प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सोमवार 3 जूनपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात असलेल्या सरकारी आयटीआयमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल दोन हजाराहून अधिक प्रवेशाच्या जागा कमी झाल्या आहेत. त्या तुलनेत खासगी आयटीआयमधील जागा मुबलक प्रमाणात वाढल्या असल्याचेही समोर आले आहेत. यासाठी केंद्र सरकारने आणलेले नवीन इंटेक कॅपॅसिटी धोरण कारणीभूत ठरले आहे.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे उपसंचालक योगेश पाटील

राज्यात सध्या ४१७ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) कार्यरत आहेत. तर खासगी आयटीआय या ४७२ होत्या. त्यात यंदा ६५ आयटीआय वाढले असल्याने ही संख्या आता ५३७ वर गेली असून खासगी आयटीआयमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात मुबलक जागा उपलब्ध होणार असल्याचे चित्र समोर आले आहे.

राज्यात असलेल्या सरकारी आणि खासगी आयटीआय मध्ये १ लाख ३७ हजार ३०० प्रवेशाच्या जागा आहेत. यात सरकारी आयटीआयमध्ये ८९ हजार ६१६ आणि खासगी आयटीआयमध्ये ४७ हजार ६८४ इतक्या प्रवेशाच्या जागा उपलब्ध असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे उपसंचालक योगेश पाटील यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.

केंद्र सरकार त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रशिक्षण महासंचालनालयच्या माध्यमातून देशातील आयटीआयच्या प्रवेश आणि त्यासंदर्भातील विविध नियमांचे धोरण ठरवते. यंदा या संचालनालयाने नवीन इंटेक कॅपॅसिटी धोरण आणून राज्य राज्यभरासह देशातील सरकारी आयटीआयच्या लाखो जागा कमी केल्या आहेत.

आतापर्यंत देशातील आयटीआयमध्ये प्रत्येक ट्रेड साठी १६, २० आणि २६ अशा विद्यार्थ्यांच्या प्रमाणानुसार इंटेक कॅपॅसिटी ठेवली जात होती. आता त्यात बदल करून केंद्र सरकारने १६, २० आणि २४ अशी केल्याने प्रत्येक ट्रेडमध्येही विद्यार्थी संख्या कमी होणार असल्याने याचा सर्वात मोठा फटका हा सरकारी आयटीआयमधील प्रवेशांवर झाला असून राज्यातील हजारो विद्यार्थी आयटीआयच्या प्रवेशापासून वंचित राहणार आहेत.

असे होतील प्रवेश

३ जून रोजी सकाळी http: admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर सकाळी ११ वाजता ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. अर्ज कसा करायचा यासाठी माहितीपुस्तिका ही संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना आपला प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी तात्पुरते प्रवेश अर्जाची छापील प्रत घ्यावी लागेल. त्यानंतर कोणत्याही आयआयटीमध्ये जाऊन संबंधित कागदपत्रे, त्याच्या सत्यप्रती सादर करने आवश्यक आहे.

Intro:केंद्राच्या इंटेक कॅपेसिटी धोरणामुळे राज्यातील आयटीआयच्या जागा घटल्या

Body:

केंद्राच्या इंटेक कॅपेसिटी धोरणामुळे राज्यातील आयटीआयच्या जागा घटल्या; उद्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

(सोबत उपसंचालक योगेश पाटील यांचा 121 जोडत आहे तो घ्यावा)

मुंबई, ता. 2 :
देशभरात कौशल्य विकासाचा मोठा गाजावाजा करणाऱ्या केंद्र सरकारने औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयसाठी नवीन इंटेक कॅपॅसिटी धोरण आणल्यामुळे राज्यातील सरकारी आयटीआय मधील प्रवेशाच्या जागा मोठ्या प्रमाणात घटल्या आहेत. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात आयटीआयच्या प्रवेशाला मागणी असतानाही यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत अनेकांना प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून राज्यातील सरकारी आणि खाजगी आयटीआयमधील प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया उद्या, सोमवारी, 3 जूनपासून सुरू होत आहे.या पार्श्वभूमीवर राज्यात असलेल्या सरकारी आयटीआयमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल दोन हजाराहून अधिक प्रवेशाच्या जागा कमी झाल्या असून त्या तुलनेत खाजगी आयटीआयमधील मुबलक प्रमाणात जागा वाढलेल्या असल्याचेही समोर आले आहेत. यासाठी केंद्र सरकारने आणलेले नवीन इंटेक कॅपॅसिटी धोरण कारणीभूत ठरले आहे.

---
राज्यात सध्या 417 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) कार्यरत आहेत. तर खाजगी आयटीआय या 472 होत्या. त्यात यंदा 65 आयटीआय वाढले असल्याने ही संख्या आता 537 वर गेली असून मोठ्या प्रमाणात खाजगी आयटीआय मध्ये मात्र मुबलक जागा उपलब्ध होणार असल्याचे चित्र समोर आले आहे.
राज्यात असलेल्या सरकारी आणि खाजगी आयटीआय मध्ये 1 लाख 37 हजार 300 प्रवाशांच्या जागा असून यात सरकारी आयटीआयमध्ये 89 हजार 616 आणि खाजगी आयटीआयमध्ये 47 हजार 684 इतक्या प्रवेशाच्या जागा उपलब्ध असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे उपसंचालक योगेश पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

----
यंदा केंद्र सरकारने केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रशिक्षण महासंचालनालयच्या माध्यमातून देशातील आयटीआयच्या प्रवेश आणि त्यासंदर्भातील विविध नियमांचे धोरण ठरवले जाते. यंदा या संचालनालयाने नवीन इंटेक कॅपॅसिटी धोरण आणून राज्य राज्यभरासह देशातील सरकारी आयटीआयच्या लाखो जागा कमी केल्या आहेत.
आतापर्यंत देशातील आयटीआय मध्ये प्रत्येक ट्रेड साठी 16, 20 आणि 26 अशा विद्यार्थ्यांच्या प्रमाणानुसार इंटॅक कॅपॅसिटी ठेवली जात होती. आता त्यात बदल करून केंद्र सरकारने 16, 20 आणि 24 अशी केल्याने प्रत्येक ट्रेड मध्ये हे विद्यार्थी संख्या कमी होणार असल्याने याचा सर्वात मोठा फटका हा सरकारी आयटीआय मधील प्रवेशायांवर झाला असून राज्यातील हजारो विद्यार्थी आयटीआयच्या प्रवेशापासून वंचित राहणार आहेत.
---
असे होतील प्रवेश
3 जून रोजी सकाळी http: admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर सकाळी 11 वाजता ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. अर्ज कसा करायचा यासाठी माहितीपुस्तिका ही संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना आपला प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी तात्पुरते प्रवेश अर्जाची छापील प्रत घ्यावी लागेल. त्यानंतर कोणत्याही आयआयटीमध्ये जाऊन संबंधित कागदपत्रे, त्याच्या सत्यप्रती सादर कटने आवश्यक आहे.

Conclusion:केंद्राच्या इंटेक कॅपेसिटी धोरणामुळे राज्यातील आयटीआयच्या जागा घटल्या

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.