ETV Bharat / state

Abu Dhabi Mumbai Flight: विमानात मद्यधुंद, अर्धनग्न महिलेची कर्मचाऱ्यांना मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल - प्रवाशावर लघुशंका करणे

विमान प्रवासात असताना सह प्रवाशावर लघुशंका करणे, हवेत विमान असताना आपत्कालीन दरवाजा उघडणे असे प्रकार प्रवाशांनी केल्याचे ताजे आहेत. आता एका मद्यधुंद महिला प्रवाशाने विमानातील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याची तसेच विमानात अर्धनग्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तिच्या विरोधात विमान अधिनियमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Drunk female passengers on the plane
विमानात मद्यधुंद महिला प्रवाशी
author img

By

Published : Jan 31, 2023, 11:08 AM IST

मुंबई: रविवारी पहाटे दुबई अबूधाबी येथून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे विमान येत होते. या विमानातून एक परदेशी महिला प्रवास करत होती. तिने दारू पिली होती. त्या महिला प्रवाशाचे तिकीट इकॉनॉमी क्लासमधील होते. मात्र ती उठून बिझनेस क्लासच्या जागेवर जाऊन बसली. विमानातील एका कर्मचाऱ्याने त्या महिलेला तिकीट इकॉनॉमी क्लासचे असल्याने बिझनेस क्लासमध्ये बसता येणार नाही असे सांगितले. हे ऐकल्यावर परदेशी प्रवासी महिलेने त्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्यांच्या अंगावर थुंकली.

गुन्हा नोंद: हा प्रकार सुरू असताना इतर प्रवासी तीला शांत राहण्याचे सांगत होते मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. काही वेळाने तिने अंगावरील कपडे काढले आणि विमानातच अर्धनग्न होऊन फिरू लागली. विमानातील वैमानिकानेही त्या महिलेला शांत राहण्यास सांगितले. त्याकडेही त्या महिला प्रवासीने दुर्लक्ष केले. त्यामुळे विमान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्याच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणावरून त्या महिला प्रवासी विरोधात विमान अधिनियम १९३७ कलम २२, २३ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न: या आधी एका प्रवाशाने नागपूर ते मुंबई विमान प्रवासादरम्यान चक्क आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आहे. विमान हवेत असताना हा प्रकार घडल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. मात्र क्रू मेंबरमुळे पुढील अनर्थ टळल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी प्रवाशावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एअर इंडियामध्ये लघुशंका: या आधीही २६ नोव्हेंबर रोजी अमेरिकेहून नवी दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या AI102 विमानात एका ७० वर्षीय महिला प्रवाशीवर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शंकर मिश्रा याने लघुशंका केली होती. त्यामुळे त्यांचे कपडे, चपला आणि पिशवीही ओली झाली होती. त्या महिलेने या संदर्भात केबिन क्रू कडे तक्रार केली होती. त्यानंतर या प्रवाशावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर फ्लाइटमध्ये संबंधीत आरोपी शंकर मिश्रा याला अटक केली होती. आरोपी शंकर मिश्रा याला पोलिसांनी बेंगळुरू येथून अटक केले होते. तसेच वृद्ध महिलेने टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना पत्र लिहले होते. त्यादरम्यान महिला प्रवाशाने लेखी तक्रार दिली होती.

हेही वाचा :Shankar Mishra Arrested विमानात लघुशंका केल्याप्रकरणात शंकर मिश्रा याला बेंगळुरूमध्ये अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.