ETV Bharat / state

पिंजाळ प्रकल्प सुरू व्हायला चार वर्षे लागणार- महापौर

author img

By

Published : Jan 2, 2020, 11:47 PM IST

स्वच्छ सुरक्षित मुंबई आणि चांगले रस्ते याचा संकल्प नवीन वर्षात केला आहे. या संकल्पानुसार शहरात काय करता येईल याबाबत आढावा घेण्यासाठी विभाग प्रमुख आणि सहाय्यक आयुक्तांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पालिकेचे सुरू असलेले अर्धवट असलेले तसेच पुढे होऊ घातलेल्या प्रकल्पांची माहिती घेतल्याचे महापौरांनी सांगितले.

mumbai
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई - मुंबईकरांना पुरेसे पाणी मिळावे म्हणून पालिकेकडून पिंजाळ आणि गारगाई प्रकल्प उभारले जात आहेत. मात्र, गारगाई प्रकल्पाचे काम अर्ध्यापर्यंत झालेले आहे. तर, पिंजाळ प्रकल्प पुढील चार वर्षांत पूर्ण होऊ शकत नसल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. महापालिकेकडून सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा आज महापौरांनी घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना महापौरांनी सदर माहिती दिली.

माहिती देताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर

स्वच्छ सुरक्षित मुंबई आणि चांगले रस्ते याचा संकल्प नवीन वर्षात केला आहे. या संकल्पानुसार शहरात काय करता येईल याबाबत आढावा घेण्यासाठी विभाग प्रमुख आणि सहाय्यक आयुक्तांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पालिकेचे सुरू असलेले अर्धवट असलेले तसेच पुढे होऊ घातलेल्या प्रकल्पांची माहिती घेतल्याचे महापौरांनी सांगितले. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी गारगाई आणि पिंजाळ ही दोन धरणे बांधली जात आहेत. त्यापैकी गारगाई धरणाचे काम अर्ध्यापर्यंत झाले. तर, पिंजाळ प्रकल्पासाठी ग्राम पंचायत स्तरावर ठराव घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचे महापौरांनी सांगितले.

वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईतील सोयी-सुविधांवर ताण येतो. महापालिका अशा परिस्थितीत सेवा पुरवते. निर्जन स्थळी मुली-महिलांसोबत छेडछाड, वयोवृध्दांची लूटमार होत असल्याची तक्रार येते. बंद मिल किंवा निर्जन ठिकाणी गैरप्रकार होत असतात. हे प्रकार रोखण्यासाठी निर्जन स्थळ खूली केली जातील. मिलच्या बंद जागांवरही मालकांच्या संमतीने देखरेख ठेवण्याचे पालिकेच्या विचाराधीन आहे. वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रासायनिक आणि ज्वलनशील पदार्थांचा वापर करणाऱ्या कारखान्यांची माहिती सादर करावी, असे निर्देश महापौर पेडणेकर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. भरवस्तीतून असे कारखाने हद्दपार करावेत, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे.

तीन महिन्यांनी आढावा बैठक

दर तीन महिन्यांनी रस्ते, पाणी, कचरा आदी सर्व महत्वांच्या मुद्द्यांवर सहाय्यक आयुक्त, विविध खातेप्रमुख आणि महापौर यांच्यात बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यावर प्राथमिक भर असेल, असे महापौर म्हणाल्या. मुंबईकरांना चांगल्या सेवा-सुविधा देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे. यावेळी राज्य नगरविकास खाते, विविध संस्थांकडून अडचणी येत असतील तर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करू, असे महापौरांनी यावेळी स्पष्ट केले.

अॅक्सिस बँकेबाबत बैठक नाही

राज्यात शिवसेना आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे शाब्दिक युद्ध सुरू आहे. त्याविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. ठाण्यानंतर मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची अॅक्सिस बँकेमध्ये खाते आहेत. पालिकेच्या किती ठेवी या बँकेत आहेत याची माहिती महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मागितली होती. त्याबाबत बैठकही आयोजित करण्यात आली होती. मात्र, पालिका आयुक्त सुट्टीवर असल्याने बैठक झाली नसल्याचे महापौरांनी सांगितले.

हेही वाचा- मुंबई आयआयटीच्या टेकफेस्टला उद्यापासून सुरुवात; दिग्गज असणार उपस्थित

Intro:मुंबई - मुंबईकरांना पुरेसे पाणी मिळावे म्हणून पालिकेकडून पिंजाळ आणि गारगाई प्रकल्प उभारले जात आहेत. मात्र गारगाई प्रकल्पाचे काम अर्ध्यापर्यंत झाले आहे. तर पिंजाळ प्रकल्प पुढील चार वर्षांत पूर्ण होऊ शकत नसल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा आज महापौरांनी घेतला. त्यानंतर महापौर पत्रकारांशी बोलत असताना ही माहिती दिली.Body:स्वच्छ सुरक्षित मुंबई आणि चांगले रस्ते याचा संकल्प नवीन वर्षात केला आहे. या संकल्पानुसार मुंबईत काय करता येईल याबाबत आढावा घेण्यासाठी विभाग प्रमुख आणि सहाय्यक आयुक्तांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पालिकेचे सुरू असलेले, अर्धवट असलेले तसेच पुढे होऊ घातलेल्या प्रकल्पाची माहिती घेतल्याचे महापौरांनी सांगितले. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी गारगाई आणि पिंजाळ ही दोन धरणे बांधली जात आहेत. त्यापैकी गारगाई धरणाचे काम अर्ध्यापर्यंत झाले. तर पिंजाळ प्रकल्पासाठी ग्राम पंचायत स्थरावर ठराव घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचे महापौरांनी सांगीतले.

वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईतील सोयी- सुविधांवर ताण येतो. महापालिका अशा परिस्थितीत सेवा पुरवते. निर्जन स्थळी मुलींना- महिलांसोबत छेडछाड, वयोवृध्दांची लटूमार होते, अशा तक्रारी येतात. बंद मिल किंवा ठिकाणी गैरप्रकार होत असतात. हे प्रकार रोखण्यासाठी निर्जन स्थळ खूली केली जातील. मिलच्या बंद जागांवरही मालकांच्या संमतीने देखरेख ठेवण्याचे पालिकेच्या विचारधीन आहे. वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रासायनिक आणि ज्वलनशील पदार्थांचा वापर करणाऱ्या कारखान्यांची माहिती सादर करावी, असे निर्देश महापौर पेडणेकर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. भरवस्तीतून असे कारखाने हद्दपार करावेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

तीन महिन्यांनी आढावा बैठक -
दर तीन महिन्यांनी रस्ते, पाणी, कचरा, आदी सर्व महत्वांच्या मुद्द्यांवर सहाय्यक आयुक्त, विविध खातेप्रमुख आणि महापौर यांच्यात बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यावर प्राथमिक भर असेल, असे महापौर म्हणाल्या. मुंबईकरांना चांगल्या सेवा- सुविधा देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे. यावेळी राज्य नगरविकास खाते, विविध संस्थांकडून अडचणी येत असतील तर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करु, असे महापौरांनी यावेळी स्पष्ट केले.

एक्सिस बँकेबाबत बैठक नाही -
राज्यात शिवसेना आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे शाब्दिक युद्ध सुरू आहे. त्याविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. ठाण्यानंतर मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची एक्सीस बँकेमध्ये खाते आहेत, पालिकेच्या किती ठेवी या बँकेत आहेत याची माहिती महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मागितली होती. त्याबाबत बैठकही आयोजित करण्यात आली होती. मात्र पालिका आयुक्त सुट्टीवर असल्याने बैठक झाली नसल्याचे महापौरांनी सांगितले.

महापौर किशोरी पेडणेकर यांची बाईट Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.