मुंबई - परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्ब पाठोपाठ आता सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्ब मुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत वाझेचे आरोप फेटाळत आपल्या मुलींची आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली होती. यावरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.
वकील साहेब शपथेवर बोलणं हा गुन्हा आहे हे आपल्याला माहित असेल ही अपेक्षा’ असे ट्विट करत मनसेचे संदीप देशपांडे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'मास्टर स्ट्रोक टू मास्टर माईंड' हा प्रवास थक्क करणारा आहे. वकील साहेब शपथेवर खोट बोलणं हा गुन्हा आहे हे आपल्याला माहित असेल ही अपेक्षा’ अशा आशयाचे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.