ETV Bharat / state

Isis Module Case : चार वॉंटेड आरोपींवर ठेवलं लाखोंचं बक्षीस, इसिस मॉड्यूल प्रकरणात एनआयचा निर्णय

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीन (NIA) ISIS पुणे मोड्यूल प्रकरणातील चार वाँटेड आरोपींवर रोख बक्षीस जाहीर केले आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या तपास संस्था (एनआयएनं) सांगितलं की, माहिती देणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवण्यात येईल.

Isis Module Case
Isis Module Case
author img

By PTI

Published : Sep 12, 2023, 6:14 PM IST

मुंबई : राष्ट्रीय तपास संस्थेनं (एनआयए) आयएसआयएस पुणे मॉड्यूल प्रकरणातील चार वाँटेड आरोपींची माहिती देणार्‍याला प्रत्येकी 3 लाख रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलंय. मोहम्मद शाहनवाज शफीउज्जमा आलम उर्फ अब्दुल्ला, रिझवान अब्दुल हाजी अली, अब्दुल्ला फैयाज शेख उर्फ डायपरवाला, तल्हा लियाकत खान अशी आरोपींची नावे आहेत. माहिती देणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल, असं एनआयएनं सांगितलं. एनआयएनं नुकतंच महाराष्ट्रातील पुण्यातील मॉड्यूलचा एक भाग म्हणून दहशतवादी संघटना ISIS च्या संबधित काही व्यक्तींना अटक केली होती.

एनआयएनं पुणेस्थित ISIS मॉड्यूल प्रकरणात छापे टाकले. या काळात देशात अशांतता निर्माण करणारे आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले. देशातील शांतता, जातीय सलोखा बिघडवण्याचा या लोकांचा कट होता,हे सर्व आरोपी ISIS च्या स्लीपर मॉड्यूलचे सदस्य होते - एनआयए

  • सर्व आरोपी ISIS च्या स्लीपर मॉड्यूलचे सदस्य : एनआयएनं पुणेस्थित ISIS मॉड्यूल प्रकरणात छापे टाकले होते. या काळात देशात अशांतता निर्माण करणारे आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले. देशातील शांतता, जातीय सलोखा बिघडवण्याचा दहशतवाद्यांचा कट एनायएयनं उधळून लावला होता. हे सर्व आरोपी ISIS च्या स्लीपर मॉड्यूलचे सदस्य होते.

हिंसाचार घडवून आणण्याच्या प्रयत्न : या प्रकरणात NIA नं गेल्या महिन्यात शामील साकिब नाचन याला अटक केली होती. त्याच्या ठाणे जिल्ह्यातील त्याच्या राहत्या घरातून अवैध साहित्य जप्त केले होते. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, नाचनसह झुल्फिकार अली बडोदावाला, मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, सिमाब नसिरुद्दीन काझी, अब्दुल कादिर पठाण असे पाच हिंसाचार घडवून आणण्याच्या प्रयत्नात होते, असं NIA नं सांगितलंय.

आयईडीद्वारे स्फोट घडवण्याचा कट : सर्व आरोपी ISIS स्लीपर मॉड्यूलचे सदस्य आहेत. प्राथमिक तपासानुसार, नाचन इतर आरोपींनी पुण्यातील कोंढवा येथील एका घरात आयईडी एकत्र केले होते. जेथे त्यांनी बॉम्ब (आयईडी) असेंब्ल केला होता. देशात इस्लामिक राज्य स्थापन करण्याच्या उद्देशानं दहशत, हिंसाचार पसरवण्याची त्यांची योजना होती, असं एनआयएनं सांगितलं.

हेही वाचा -

  1. Parliament Employee New Uniform : संसद कर्मचाऱ्यांच्या नव्या पोषाखावरून नवा वाद, विरोधकांनी काय घेतला आहे आक्षेप?
  2. Manipur Violence : माणिपुरात पुन्हा हिंसाचार, तिघांची गोळ्या झाडून हत्या केल्यानं तणावाची स्थिती
  3. Nitin Gadkari on Tax on Diesel vehicles : डिझेल वाहनांवर खरचं १० टक्के जीएसटी लागणार का? नितीन गडकरींनी केला मोठा खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.