ETV Bharat / state

Sachin Sawant Arrested by ED: आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांना 5 जुलैपर्यंत ED कोठडी - Sachin Sawant

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आलेले वरिष्ठ अधिकारी सचिन सावंत यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तर आता सचिन सावंत यांना 5 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

mumbai court
पाच जुलैपर्यंत कोठडी
author img

By

Published : Jun 28, 2023, 5:17 PM IST

मुंबई : सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात कार्यरत असलेले सचिन सावंत यांच्या मुंबईतील निवासस्थानावर ईडीकडून मंगळवारी छापा टाकण्यात आला. भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

न्यायालयामध्ये अर्ज दाखल : याप्रकरणी चौकशी होण्यासाठी न्यायालयामध्ये ईडीने दावा केला होता. अंमलबजावणी संचालनालयाने सचिन सावंत यांच्या घरावर मंगळवारी छापा टाकला होता. त्या छाप्यामध्ये अनेक कागदपत्रे आणि महत्त्वाचे दस्तावेज ईडीच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी तातडीने रिमांड मिळावा असा अर्ज न्यायालयामध्ये केला होता. विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एमजी देशपांडे यांनी उपलब्ध दस्तावेज आणि कागदपत्राच्या आधारे सचिन सावंत यांना 5 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

500 कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेचा आरोप : सचिन सावंत याच्यावर 500 कोटी रुपये बेहिशेबी मालमत्ता पदावर असताना गोळा केल्याचा आरोप आहे. जीएसटी विभाग आणि सीमा शुल्क विभागांमध्ये ज्यावेळेला सचिन सावंत कार्यरत होते, तेव्हापासून त्यांनी आजपर्यंत 500 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. त्या आरोपाच्या आधारेच पीएमएलए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एमजी देशपांडे यांनी आज, ईडीच्या मागणी अर्जानंतर गुणवत्तेच्या आधारे पाच जुलै पर्यंत सचिन सावंत यांना ईडी कोठडी सुनावलेली आहे.

5 जुलैपर्यंत पोलीस कोठडी : न्यायालयात ईडीचे वाकिल सुनील गोंसलविस यांनी बाजू मांडली की, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आरोप करण्यात आले आहे. सचिन सावंत हे आयआरएस म्हणजेच महसूल विभागात प्रथम श्रेणी दर्जाचे अधिकारी आहे. त्यांना लखनऊ येथून मुंबईत आणले गेले, चौकशीसाठी ईडी कोठडी जरुरी आहे. आज न्यायालयात सुनावणी नंतर न्यायालयाने पाच जुलै पर्यंतची चौकशीसाठी ईडी कोठडी सुनावलेली आहे.

हेही वाचा -

  1. ED Probe Sangli : तब्बल 53 तासानंतर 'त्या' खात्यांची ईडीकडून चौकशी पूर्ण, ईडीच्या रडारवर कोण ?
  2. ED raids in Mumbai : आयआरएस अधिकारी सचिन सावंतच्या घरी ईडीचे छापे, कारवाईनंतर सीबीआयकडून अटक, 500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी कारवाई
  3. ED raids in Mumbai: मुंबईत ईडीची सलग १७ तास छापेमारी, ठाकरे निकटवर्तींयासह आयएएस अधिकारी, बीएमसी अधिकारी लागणार गळाला?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.