ETV Bharat / state

इकबाल सिंग चहल यांनी स्विकारली महानगरपालिका आयुक्तपदाची सूत्रे - Mumbai Municipal Commissioner

महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची अपर मुख्‍य सच‍िव (१), नगर विकास विभाग या पदावर राज्‍य शासनाने नियुक्ती केली असून त्यांच्या जागी इकबाल सिंग चहल यांची नियुक्ती करण्यात आली. त्‍यानुसार चहल यांनी शुक्रवारी सायंकाळी महानगरपालिका आयुक्‍त म्‍हणून पदभार स्वीकारला. महानगरपालिकेत नियुक्ती होण्यापूर्वी चहल हे प्रधान सचिव (१), नगर विकास विभाग या पदावर कार्यरत होते. तसेच त्‍यांच्‍याकडे जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव पदाचा अतिरिक्‍त कार्यभारही होता.

Iqbal Singh Chahal
इकबाल सिंग चहल
author img

By

Published : May 9, 2020, 7:36 AM IST

मुंबई - कोरोना विषाणूला रोखण्यात अपयशी ठरल्याने मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांची राज्य सरकारने उचलबांगडी केली. त्यांच्या जागी नियुक्त केलेले इकबाल सिंग चहल यांनी आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. चहल यांच्या पुढे मुंबईमधील कोरोना विषाणूला रोखण्याचे आणि मुंबईला रेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये आणण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची अपर मुख्‍य सच‍िव (१), नगर विकास विभाग या पदावर राज्‍य शासनाने नियुक्ती केली असून त्यांच्या जागी चहल यांची नियुक्ती करण्यात आली. त्‍यानुसार चहल यांनी शुक्रवारी सायंकाळी महानगरपालिका आयुक्‍त म्‍हणून पदभार स्वीकारला. महानगरपालिकेत नियुक्ती होण्यापूर्वी चहल हे प्रधान सचिव (१), नगर विकास विभाग या पदावर कार्यरत होते. तसेच त्‍यांच्‍याकडे जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव पदाचा अतिरिक्‍त कार्यभारही होता.

इकबाल सिंग चहल यांनी महानगरपालिका आयुक्तपदाचा पदभार स्विकारला

इकबाल सिंग चहल यांची ओळख -

२० जानेवारी १९६६ रोजी जन्‍मलेल्‍या चहल यांनी १२ वी परीक्षेत विज्ञान शाखेत ९६ टक्‍के गुणांसह राष्‍ट्रीय गुणवत्‍ता यादीत स्‍थान पटकावले होते. इलेक्‍ट्रॉनिक्‍स अॅण्‍ड इलेक्‍ट्रीकल कम्‍युनिकेशन इंजिनिअरिंग या विषयात बी. टेक. (ऑनर) ही पदवी संपादित केल्यानंतर चहल यांनी १९८९ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत यश संपादन करून सनदी सेवेमध्‍ये महाराष्‍ट्र तुकडीत प्रवेश केला.

इकबाल सिंग चहल यांची कारकीर्द -

भारतीय प्रशासकीय सेवेचा ३१ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या चहल यांनी नाशिक जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, औरंगाबाद विभागाचे अतिरिक्‍त आयुक्‍त, औरंगाबादचे जिल्‍हाधिकारी, ठाणे जिल्‍हाधिकारी, पर्यावरण विभागाचे सहसचिव, धारावी पुनर्वसन प्रकल्‍पाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, म्‍हाडाचे उपाध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क आयुक्‍त, वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाचे सचिव ही पदे सक्षमतेने सांभाळली आहेत. त्‍यांच्‍या कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने त्‍यांना केंद्रीय गृह खात्‍याचे सहसचिव, केंद्रीय महिला व बालकल्‍याण विभागाचे सहसचिव, पंचायती राज विभागाचे सहसचिव अशा विविध पदांची जबाबदारी मार्च २०१३ ते मार्च २०१६ या कालावधीमध्‍ये सोपवली होती.

इकबाल सिंग चहल यांच्यामुळे महाराष्ट्राला मिळालेले पुरस्कार -

गृहनिर्माण व पुनर्वसन प्रकल्‍प, ग्रामविकास, दारिद्र्य निर्मूलन, सामाजिक न्याय, आदिवासी विकास या विभागांमध्‍ये भरीव योगदान दिलेल्‍या चहल यांनी जलसंपदा खात्‍यामध्‍ये केलेल्‍या कामगिरीच्या आधारे जानेवारी २०१८ मध्‍ये महाराष्‍ट्राला उत्‍कृष्‍ट जलसिंचन व्‍यवस्‍थापनाचा केंद्रीय पुरस्‍कार मिळवून दिला. त्‍यांच्‍या नेतृत्‍वात ‘सेतू’ केंद्राच्‍या यशस्‍वी कामगिरीबदृल राजीव गांधी प्रगती पुरस्‍कार, कॉम्‍प्‍युटर सोसायटी ऑफ इंड‍ियाचा राष्‍ट्रीय ई-गव्‍हर्नन्‍स पुरस्‍कार २००२ देखील मिळाला आहे. फेब्रुवारी २०१९ मध्‍ये राज्‍याला राष्‍ट्रीय जल पुरस्‍कार मिळवून देण्‍यात त्‍यांचा महत्‍त्‍वाचा वाटा होता. २००४ ते २०१८ पर्यंत सलग २१ किमी अंतराच्‍या मुंबई हाफ मॅरेथॉनमध्‍ये सहभाग घेणारे धावपटू म्‍हणूनदेखील त्‍यांची वेगळी ओळख आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.