ETV Bharat / state

IPS Rashmi Shukla : रश्मी शुक्ला लवकरच महाराष्ट्रात करणार कमबॅक?; मुंबईत पोस्टिंग मिळण्याची शक्यता - phone tapping case

बहुचर्चित फोन टॅपिंग प्रकरणात ( Illegal phone tapping case ) अडकलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला ( IPS Rashmi Shukla ) यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रातून हैद्राबादमध्ये पाठवण्यात आले होते. मात्र, याच रश्मी शुक्ला आता मुंबईत येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. ज्यांची सत्ता असते, त्यांचे मर्जीतील किंवा जवळच्या अधिकाऱ्यांना क्रीम पोस्टिंग दिली जाते. याचे हे ढळढळीत उदाहरण आहे. भाजपा आणि शिंदे गटाचे सरकार राज्यात आल्यानंतर रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणातून क्लीन चिट ( Rashmi Shukla Clean chit in phone tapping case ) मिळाली. त्यानंतर त्यांना आता हैदराबादहून मुंबईत आणणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 16, 2022, 9:33 PM IST

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील राजकीय नेत्यांच्या बेकायदेशीरपणे फोन टॅपिंगप्रकरणी ( Illegal phone tapping case ) पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला ( IPS Rashmi Shukla ) यांच्यावर आरोप करण्यात आला होता. तत्कालीन सरकारने त्रिसदस्यीय समितीची स्थापना करत समितीने दिलेल्या अहवालात रश्मी शुक्ला या दोषी आढळल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या अहवालाची शहानिशा केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, रश्मी शुक्ला यांच्या विरोधातील गुन्ह्याचा तपास बंद करण्यात येत असल्याचा अहवाल (क्लोजर रिपोर्ट) ऑक्टोबरमध्ये पोलिसांनी न्यायालयात केल्यानंतर शुक्ला यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाली ( Rashmi Shukla Clean chit in phone tapping case ). येत्या काही दिवसात मुंबईला महिला पोलीस आयुक्त मिळणार ( Women Commissioner of Mumbai Police ) असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली.

सध्या हैद्रराबाद येथे कार्यरत : फोन टॅपिंग प्रकरणात अडकलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला ( IPS Rashmi Shukla ) यांचे नाव मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्त म्हणून चर्चेत आहे. रश्मी शुक्‍ला 1988 च्या बॅचचे आयपीएस आधिकारी आहे. रश्मी शुक्ला सध्या हैदराबाद येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. येत्या काळात आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनाआधीच या बदल्या केल्या. या बदल्यांबाबत रोज नवनवीन अंदाज बांधले जात होते. आज रश्मी शुक्ला या मुंबईच्या नव्या पोलिस आयुक्त होणार असल्याची चर्चा आहे. त्यांना या सर्व प्रकरणात सीबीआयकडून क्लीन चिट मिळाली आहे.

रश्मी शुक्ला यांची कारकीर्द वादग्रस्त : बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी ( Illegal phone tapping case ) सरकारने त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली होती. त्या समितीने दिलेल्या अहवालात रश्मी शुक्ला या दोषी आढळल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या अहवालाची शहानिशा केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) यांनी याबाबत माहिती दिली होती. सध्या रश्मी शुक्ला हैद्राबाद येथे कार्यरत आहेत.

कोण आहेत रश्मी शुक्ला : रश्मी शुक्‍ला 1988 च्या बॅचचे आयपीएस आधिकारी ( IPS Rashmi Shukla ) आहे. रश्मी शुक्ला सध्या हैदराबाद येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. महासंचालक हेमंत नगराळे यांच्यानंतर शुक्ला या सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. नगराळे 31 ऑक्टोबर रोजी निवृत्त होत आहेत. रश्मी शुक्ला या राज्यातील सर्वात वरिष्ठ IPS अधिकारी आहेत. शुक्ला या IPS अधिकारी रजनीश सेठ यांच्याहून देखील वरिष्ठ आहेत. शुक्ला जून 2024 मध्ये निवृत्त होणार आहेत.

नवी मुंंबईला सीपीची प्रतीक्षा : ब्रिजेश सिंग यांना नवी मुंबई पोलीस आयुक्त केले जाऊ शकते. नाशिक ग्रामीणचे डॅशिंग पोलिस अधीक्षक सचिन पाटील झोन 9 चे डीसीपी होणार आहेत. मंजुनाथ सिंगे यांनाही झोन ​​मिळणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.