ETV Bharat / state

Business Inspirational Stories : लाडू व्यवसायाला आयपीओचे बळ; सोनाली यांचा उद्योग शेअर बाजारात समभाग विक्रीसाठी सज्ज

भारतीय खाद्य संस्कृतीत पूर्वपारपासून विविध प्रांतात बनत आलेले विविध प्रकारचे लाडू म्हणजे पौष्टिकतेचे वरदान आहे. प्रत्येक हंगामालाही ते अनुरूप आहेत. बोरिवली स्थित आहारतज्ज्ञ आणि उद्योजिका सोनाली कोचरेकर यांनी याच लाडूच्या जोरावर आपल्या व्यवसायाला सदृढ केले आहे. याबाबत सविस्तरपणे या खास रिपोर्टमधून जाणून घेवू या.

Ladoo Business
उद्योजिका सोनाली कोचरेकर
author img

By

Published : Jan 31, 2023, 8:00 AM IST

Updated : Jan 31, 2023, 8:20 AM IST

प्रतिक्रिया देताना बोरिवली स्थित आहार तज्ञ आणि उद्योजिका सोनाली कोचरेकर

मुंबई: वसई विरारमध्ये दोन कारखान्यात उत्पादन घेणाऱ्या सोनाली यांचा उद्योगाचा शेअर बाजारात समभाग विक्रीसाठी सज्ज झाला आहे. लाडू म्हटले की, आपल्या आई आजींच्या हातची रेसिपी प्रत्येकाला आठवते. तोच स्वाद आधुनिक रूपात देण्याचा व्यवसाय सोनाली कोचरेकर यांनी अवघ्या चार वर्षांपूर्वीच सुरू केला आहे. बोरिवलीच्या योजना महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या सोनाली यांनी फार्मसी व न्यूट्रिशन या विषयात सांताक्रुज एसएनडीटी विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. अडीचशे प्रकारच्या लाडवांसह एकूण 45 खाद्यपदार्थ, चारशे महिलांचे मनुष्यबळ आणि देशभरात साडेतीनशेहून अधिक दुकानांमध्ये आठ ब्रँड अशी भरारी त्यांनी घेतली आहे.

लाडू बनवायला जागा अपुरी: सोनाली सांगतात की, सुरुवातीला नोकरी करतानाच घरात पाच प्रकारचे पौष्टिक लाडू त्यांनी केले. परिचयातील व्यक्तींकडून त्यासाठी ऑर्डर येऊ लागली. मागणी वाढत चालल्याने त्यांनी त्यासाठी आणखी चार ते पाच महिलांची मदत घ्यायचे ठरवले. त्यातूनच या व्यवसायाची पायाभरणी झाली. अवघ्या चार वर्षात अडीचशे प्रकारच्या लाडूसह मागणी येईल, त्याप्रमाणे लाडू बनविणे आणि तब्बल 45 प्रकारचे विविध प्रकार तयार करण्यापर्यंत त्यांचा उद्योगाचा विस्तार झाला. कोरोना काळात अनेक व्यवसायांना तग धरणे कठीण झाले होते. मात्र त्याही परिस्थितीत घरगुती व पौष्टिक पदार्थाची मागणी मात्र वाढली होती. लाडू विक्री जोरात सुरू होती. घरी हा उद्योग वाढविण्याला मर्यादा होत्या, तसेच मोठे भांडवल ही उभारण्याचेही आव्हान होते. अशावेळी केंद्र व राज्य सरकारतर्फे लघु उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या योजनांची त्यांनी मदत घेतली. घरातून बाहेर पडून वसई आणि विरार येथे दोन कारखाने उभारले.

350 हून अधिक दुकानांमध्ये विक्री: सोनाली कंजूमर प्रॉडक्ट लिमिटेड नावाची त्यांची कंपनी आता पब्लिक लिमिटेड कंपनी झाली आहे. त्यात 70 टक्के महिला कर्मचारी आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, दिल्ली या शहरांमधील साडेतीनशे दुकानांमध्ये त्यांची उत्पादने विकली जातात. पौष्टिक लाडू मुळे जीवनसत्व प्रथिने आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात मिळतात, असे आहार तज्ञ सोनाली सांगतात. लवकरच ही उत्पादने निर्यात करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. कंपनीचा आयपीओ हा आणखी एक मैलाचा दगड आहे. मुंबई शेअर बाजारात त्याचे लिस्टिंग होणार आहे, असे त्यांनी सांगितले. तर, सद्यस्थितीत आयपीओ लिस्टिंगचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या पंधरा ते वीस दिवसात या कंपनीचे शेअर्स सर्वांसाठी खुले होणार असल्याचा सोनाली यांनी सांगितले.

हेही वाचा: Old Woman Draws Painting : वय फक्त आकडाच! केरळमधील 90 वर्षीय महिलेचे चित्र प्रेम;पाहा खास स्टोरी

Last Updated : Jan 31, 2023, 8:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.