ETV Bharat / state

खिचडी घोटाळ्यात ठाकरेंच्या मित्रांचा सहभाग, किरीट सोमैयांचा गंभीर आरोप - संजय राऊत

आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या मित्र परिवाराचा खिचडी घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे. त्यांनी सर्व तपास यंत्रणांना गुन्हा दाखल करण्याची देखील विनंती केली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

Kirit Somaiya
Kirit Somaiya
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2023, 7:56 PM IST

किरीट सोमैया यांची पत्रकार परिषद

मुंबई : मुंबईतील महानगरपालिकेच्या गरीब कामगारांना कोविड काळात खिचडी वाटप करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला होता. यासाठी मुंबई महानगरपालिकेने 50 कंत्राटदार नेमून 160 कोटी रुपयांच्या खिचडीचे वाटप केल्याचे दाखवले आहे. पाच कोटी पॅकेट्स कामगारांना वाटल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र या खिचडी वाटपामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषदेत केला.

बारा कंत्राटदार बोगस : खिचडी वाटपाचे कंत्राट पन्नास कंत्राटदारांना महानगरपालिकेतर्फे देण्यात आले होते. 12 पेक्षा अधिक कंत्राटदार बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे. या खिचडी वाटपामध्ये आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचाही समावेश असल्याचा दावा किरीट सोमैया यांनी केला आहे. 50 कंत्राटदारांना 132 कोटी 89 लाख रुपये वितरित केल्याची माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. यापैकी राजीव साळुंखे या केईएम रुग्णालयासमोर रिफ्रेशमेंट चालवणाऱ्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये दहा कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. सह्याद्री रिफ्रेशमेंट या नावाने वैश्य सहकारी बँकेत हे खाते असून या खात्यामध्ये खिचडी वाटपाचे पैसे वर्ग करण्यात आले असे सोमैयां यांनी म्हटले आहे.

राऊत, ठाकरे यांनी उत्तरे द्यावीत : खिचडी वाटपाचे पैसे जमा झालेल्या कंत्राटदारांच्या खात्यामधून पैसे कुठे गेले? कोणाच्या खात्यात गेले, याची उत्तरे संजय राऊत, सुजित पाटकर, आदित्य ठाकरे यांनी द्यावीत. पैसे संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्या मित्र परिवाराला मिळाले का? त्यांनी स्पष्ट करावे. कोट्यवधी रुपयांचा हा खिचडी घोटाळा असल्याचा आरोप सोमैया यांनी केला आहे. यासंदर्भात आपण सक्तवसुली संचालनालय, आयकर विभाग, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.

कोट्यवधींचा घोटाळा : कोविड काळात कामगारांना 25 लाख खिचडीची पाकिटे वाटप करण्यात आली होती. खिचडीची पाकिटे देण्याच्या नावाखाली पालिकेकडून 8-10 कोटी मिळाले. त्यातील 4 कोटी बोगस कंपन्यांना हस्तांतरित केल्याचा दावा सोमैया यांनी केला आहे. बोगस कंपन्या तसेच नेत्यांच्या नावावर ठाकरे गटाच्या नेत्यांनी हा कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा - Kirit Somaiya On Covid Scam : कथित व्हिडिओ क्लिपनंतर किरीट सोमय्या पुन्हा मैदानात; उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.