मुंबई- जगभरात ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस स्त्रीत्वाचा उत्सव म्हणून ओळखला जातो. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत. आपल्या कर्तृत्त्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारी घेतली आहे. महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे.
भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या संघटनांना बळ मिळाले. स्त्रिया बोलत्या झाल्या अन्यायाविरूद्ध वाचा फोडू लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता सर्वच ठिकाणी महिला ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे.