ETV Bharat / state

International Film Festival : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आज मुंबईत उद्घाटन - आज मुंबईत उद्घाटन

माहितीपट,लघुपट आणि अनिमेशनपट यांना समर्पित असलेला 17 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ( International Film Festival) आजपासून मुंबईतील (Inauguration in Mumbai today) फिल्म डिव्हिजन (Film Division) परिसरात सुरू होत आहे.

International Film Festival
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
author img

By

Published : May 29, 2022, 4:58 PM IST

मुंबई: 17 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम वरळी येथिल नेहरू केंद्रातल्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. उद्घाटनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर महोत्सवाच्या ओपनिंग फिल्म्स म्हणून तीन चित्रपट रसिकांना दाखवले जाणार आहेत. आयोजकांनी शुभारंभाच्या चित्रपटांसाठी तीन विविध प्रकारच्या चित्रपटांची निवड केली आहे. यात 'कास्ट अवे' हा फ्रान्सचा अँनिमेशनपट, जपानचा, 'शाबु शाबु स्पिरिट' हा लघुपट आणि भारतातला मणिपुरी माहितीपट 'मीरम- द फायरलाईन' दाखवले जाणार आहेत.

हा महोत्सव माहितीपट, लघुपट आणि अँनिमेशनपटाना समर्पित असतो, त्यामुळे शुभारंभाच्या चित्रपटांसाठी प्रत्येक प्रकारातून एका चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. हे तिन्ही चित्रपट मिफ मध्ये नंतरही दाखवले जाणार आहेत. मिफमधे समाविष्ट चित्रपटांमधील, भाषा, आशय, विषय आणि पद्धती यांच्यातील वैविध्य या तीन चित्रपटातून रसिकांना दिसेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.