मुंबई: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या वतीने 'द साउंड ऑफ म्युझिक' सादर करण्यात येत आहे. हे आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी आणि पसंतीस उतरलेल्या ब्रॉडवे म्युझिकल्सपैकी एक आहे. सातवेळा टोनी पुरस्काराचा मानकरी ठरलेला या कार्यक्रमाचा प्रवेश केवळ संगीतमय नसून आंतरराष्ट्रीय ब्रॉडवेचे भारतात पदार्पण आहे. 1930 दरम्यान ऑस्ट्रियामध्ये संगीत, प्रणय आणि संघर्षावरील आनंद याद्वारे मानवी वृत्तीच्या विजयाचे चित्रण हा कार्यक्रम करतो. या दर्जेदार निर्मितीत ‘माय फेव्हरेट थिंग्ज’, ‘डू रे मी’, ‘द हिल्स आर अलाइव्ह’ आणि ‘सिक्स्टीन गोइंग ऑन सेव्हेंटीन’ यांसारख्या 26 गाजलेल्या गाण्यांचा समावेश आहे.
-
Mumbai | The Nita Mukesh Ambani Cultural Centre is presenting Rodgers and Hammerstein’s ‘The Sound of Music’, one of the most successful and loved Broadway musicals ever. Produced and managed by Broadway International Group, ‘The Sound of Music’ is a 5-time Tony Award winning… pic.twitter.com/FD3ATtyn1y
— ANI (@ANI) May 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mumbai | The Nita Mukesh Ambani Cultural Centre is presenting Rodgers and Hammerstein’s ‘The Sound of Music’, one of the most successful and loved Broadway musicals ever. Produced and managed by Broadway International Group, ‘The Sound of Music’ is a 5-time Tony Award winning… pic.twitter.com/FD3ATtyn1y
— ANI (@ANI) May 3, 2023Mumbai | The Nita Mukesh Ambani Cultural Centre is presenting Rodgers and Hammerstein’s ‘The Sound of Music’, one of the most successful and loved Broadway musicals ever. Produced and managed by Broadway International Group, ‘The Sound of Music’ is a 5-time Tony Award winning… pic.twitter.com/FD3ATtyn1y
— ANI (@ANI) May 3, 2023
भारतातील सर्वोत्कृष्ट संगीताचे प्रदर्शन: संस्थापिका आणि अध्यक्षा श्रीमती नीता मुकेश अंबानी म्हणाल्या की, नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर मध्ये भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय ब्रॉडवे म्युझिकल म्हणून ‘द साउंड ऑफ म्युझिक’ सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही ‘द ग्रेट इंडियन म्युझिकल’ मध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट संगीताचे प्रदर्शन केले आणि आता आत्तापर्यंतचे सर्वात लोकप्रिय आंतरराष्ट्रीय संगीत भारतात आणताना आम्हाला आनंद होत आहे.
भारताबाहेर प्रवास करण्याची गरज नाही: कला ही आशा आणि आनंद पसरवते. 'द साउंड ऑफ म्युझिक' आनंददायक आणि कालातीत आहे. मला आशा आहे की, मुंबई आणि भारतातील लोक त्यांच्या कुटुंबियांसह आणि मुलांसह याचा आनंद घेतील, असे त्या म्हणाल्या. ग्रँड थिएटर 2000 आसन क्षमता असलेले संगीतासाठी योग्य ठिकाण आहे. ऑस्ट्रियातील 1930 च्या दशकातील निसर्गरम्य पार्श्वभूमी, लाइव्ह ऑर्केस्ट्रा आणि रंगमंचावर लाइव्ह गायनाचा अनुभव इथे घेता येणार आहे. ‘द साउंड ऑफ म्युझिक’ हे प्रेम, हास्य आणि संगीताचा एक अविस्मरणीय विलक्षण कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा उन्हाळ्यात तुम्हाला आंतरराष्ट्रीय अनुभवासाठी भारताबाहेर प्रवास करण्याची गरज नाही. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये ‘द साउंड ऑफ म्युझिक’ अनुभवण्यासाठी, तुमची तिकिटे आत्ताच बुक करा.