ETV Bharat / state

गुड न्यूज..! उद्यापासून लालपरीची आंतरजिल्हा सेवा होणार सुरू

author img

By

Published : Aug 19, 2020, 7:09 PM IST

Updated : Aug 19, 2020, 8:44 PM IST

लालपरी सुरू झाल्याने लॉकडाऊनमुळे थांबलेला गावगाडा पुन्हा रुळावर येण्यास मदत होणार आहे. एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे २२ मार्चपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा बंद होती. परंतु, आता जिल्हाबंदी सरकारने उठवली आहे. मात्र, खासगी वाहनांसाठी ई-पास लागू राहणार आहे.

परिवहन बस
परिवहन बस

मुंबई- 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत आता राज्यात आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. ही सेवा उद्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे, आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे. यासाठी बस किंवा प्रवाशांना परवानगी किंवा ई-पासची गरज लागणार नाही, अशी माहिती आज पत्रकार परिषद घेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

माहिती देताना मंत्री अनिल परब

बस सेवा सुरू होणार असल्याने गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी माहिती परब यांनी दिली. ते पुढे म्हणाले, उद्यापासून एसटीची साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी यासर्व प्रकारच्या बस सेवा (मूळ तिकीट दरात) टप्याटप्याने सुरू होत असून त्यापैकी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. एसटीच्या प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नसून प्रवासात प्रवाशांनी शासनाने घालून दिलेल्या कोविड-१९ च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे, असे परब म्हणाले.

२३ मार्चपासून कोरोना महामारीमुळे मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यातील एसटी सेवा बंद होती. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एसटीने परप्रांतीय मजुरांची वाहतूक, कोटा येथून महाराष्ट्रीयन विध्यार्थाना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविणे, कोल्हापूर-सांगली येथील ऊसतोड मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडणे, अशा प्रकारे समाजातील सर्व घटकांना सुरक्षित दळणवळण सेवा पुरविली आहे. २२ मे पासून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्याद्वारे दररोज सुमारे १ हजार ३०० बसेसमधून सरासरी ७ हजार २८७ फेऱ्यांतून अंदाजे दीड लाख प्रवाशांना सुरक्षित सेवा एसटीने पुरविली आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या आंतरजिल्हा बससेवेचा कोविड-१९ च्या काळातील शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन परब यांनी केले आहे.

एसटीची तुरळक सेवा सुरू होती

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाला. परिणामी एसटी सेवा ठप्प झाली. मुंबई विभागात अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठी आजही एसटी धावत होती. राज्यातील इतर विभागात देखील एसटीची तुरळक सेवा सुरू होती. कोरोनाच्या या महामारीत एसटी लॉकडाऊनमुळे आपल्या गावाकडे जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांसाठी महाराष्ट्राच्या शेवटच्या सीमेपर्यंत धावली. इतकेच नव्हे तर, राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी एसटी थेट कोट्यापर्यंत पोहोचली.

२ हजार ३०० कोटींचा महसूल बुडाला

लॉकडाऊनमुळे ११३ दिवसांच्या कालावधीत एसटीच्या इतिहासात प्रथमच २ हजार ३०० कोटींचा महसूल बुडाला. याआधी परिवहन विभागाने मे महिन्यात आंतरजिल्हा एसटी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, लोकांच्या मनात जबरदस्त भीती आहे. रेड झोनमधून इतर जिल्ह्यांमध्ये माणसे पाठवू नका, कोरोना पसरवू नका, अशा तक्रारी आमच्याकडे आल्या. काही लोकांनी विरोध केला, त्यामुळे आम्ही ताबडतोब आंतरजिल्हा एसटीचा निर्णय स्थगित केला होता. पण आता सेवा सुरू करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले. तसेच, आंतरजिल्ह्यात टप्प्याटप्प्याने सेवा सुरू करण्याचा विचार आहे. बसेस सज्ज आहेत. गरज भासेल त्यानुसार त्या सोडल्या जातील, असे परब म्हणाले.

हेही वाचा- कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृतदेहाच्या निर्जंतुकीकरणासाठी राबवली 'ही' प्रक्रिया

Last Updated : Aug 19, 2020, 8:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.