ETV Bharat / state

मुंबईतील सर्व मॅनहोलची पुन्हा तातडीने तपासणी करा - पालिका आयुक्तांचे निर्देश - मॅनहोलची पुन्हा तातडीने तपासणी करा

भांडूप (पश्चिम) येथील व्हिलेज रस्त्यावर पूर्वेला असलेल्या एका मॅनहोलचे झाकण कालच्या जोरदार पावसाप्रसंगी निघाल्याची आणि त्‍यामुळे दोन महिला त्‍यात पडताना वाचल्‍याची चित्रफित समाजमाध्‍यमांमध्‍ये तसेच वृत्‍तवाहिन्‍यांवर प्रसारीत झाली आहे. हे मॅनहोल तातडीने हटवून तेथे नवीन मॅनहोल लावण्‍यात आले आहे, असे महापालिकेने कळविले आहे. पावसाळापूर्व कामाचा भाग म्हणून सर्व ठिकाणच्या मॅनहोलची तपासणी करून आवश्यक ती दुरूस्ती करण्यात येते.

मुंबई महानगरपालिका
मुंबई महानगरपालिका
author img

By

Published : Jun 10, 2021, 5:45 PM IST

मुंबई - भांडुपच्या व्हिलेज रोड परिसरामध्ये दोन महिला फुटपाथवरील गटाराचे झाकण तुटल्याने पडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रस्त्यांवरील मॅनहोलची तातडीने आणि नव्याने तपासणी करण्याचे सक्त निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिले आहेत.

नवीन मॅनहोल लावण्यात आले

भांडूप (पश्चिम) येथील व्हिलेज रस्त्यावर पूर्वेला असलेल्या एका मॅनहोलचे झाकण कालच्या जोरदार पावसाप्रसंगी निघाल्याची आणि त्‍यामुळे दोन महिला त्‍यात पडताना वाचल्‍याची चित्रफित समाजमाध्‍यमांमध्‍ये तसेच वृत्‍तवाहिन्‍यांवर प्रसारीत झाली आहे. हे मॅनहोल तातडीने हटवून तेथे नवीन मॅनहोल लावण्‍यात आले आहे, असे महापालिकेने कळविले आहे. पावसाळापूर्व कामाचा भाग म्हणून सर्व ठिकाणच्या मॅनहोलची तपासणी करून आवश्यक ती दुरूस्ती करण्यात येते. असे असले तरी, कालच्या जोरदार पावसानंतर आणि पाण्याचा निचरा झाल्यानंतर महानगरपालिकेच्‍या वतीने पुन्‍हा एकदा सर्व रस्‍त्‍यांची पाहणी करुन मॅनहोलची तपासणी केली जात आहे. आवश्‍यक तेथील मॅनहोल बदलण्‍याची कार्यवाही करण्‍यात येत आहे. तसे सक्त निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.

दुर्घटना टाळण्यासाठी मॅनहोलमध्ये जाळ्या

मुंबईमध्ये साचणारे पाणी समुद्रात सोडण्यासाठी व पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे बनवण्यात आली आहेत. ही गटारे साफ करता यावीत यासाठी मॅनहोल आहेत. मुंबईत असे एकूण ७३ हजारांवर मॅनहोल आहेत. पावसावेळी पाणी साचल्यास मॅनहोल उघडे ठेवल्यास त्यामध्ये नागरिक पडून वाहून जाऊ नयेत म्हणून १३९६ मॅनहोलच्या आत लोखंडी जाळ्या बसवण्यात आले आहेत. मुंबई शहरातील ८५५, पश्चिम उपनगरातील ३५५ आणि पूर्व उपनगरातील १८६ अशा एकूण १३९६ मॅनहोलच्या आतमध्येही सुरक्षेसाठी लोखंडी जाळ्या बसवल्या आहेत.

हेही वाचा-LIVE मालाड इमारत दुर्घटना : केंद्राकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाखांची मदत; पंतप्रधानांनी केलं दु:ख व्यक्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.