नवी मुंबई/ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका करणाऱ्या पोस्टमुळे अभिनेत्री केतकी चितळे ( Ketaki Chitale Arrested ) चर्चेत आली होती. कळवा पोलीस ठाण्यात केतकीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांनी ( Thane Police ) केतकी चितळेला ताब्यात घेतले आहे. केतकी चितळे सायंकाळी 4.30 वाजल्यापासून कळंबोली पोलिसांच्या ताब्यात असून कळंबोली पोलीस ( Kalamboli Police ) चितळेला ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. दरम्यान, केतकी चितळेवर शाईफेक ( ink Throw on Ketaki Chitale ) करण्यात आली आहे.
ठाणे पोलिसांच्या ताब्यात - ठाणे गुन्हे शाखेचे केतकी चितळेला उशिरा ताब्यात घेतले. यावेळी गुन्हे शाखेच्याबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत तीव्र आंदोलन छेडले. नवी मुंबईच्या पोलिसांकडून तिचा ताबा ठाणे गुन्हे शाखेने घेतला.
मनोरुग्णालयात दाखल करण्याची केली मागणी - राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत गुन्हे शाखेच्या बाहेर घोषणाबाजी केली. केतकी चितळे माफी मागो, केतकी चितळेला मनोरुणालायत दाखल करा, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यानी केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
हेही वाचा - Ketaki Chitale Controversy : 'केतकीला चोप देणार, तेव्हाच तिची अक्कल ठिकाण्यावर येईल'