मुंबई - सन २०२४ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी उभी करू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. मात्र, वाढलेला दर पाहता त्याला आता मूठमाती मिळत आहे. ५ ट्रिलियन इकॉनॉमी हा आता फक्त भाजपच्या प्रचाराचा भाग राहिला आहे. ५ टक्क्यांच्यावर महागाई जाणे हे धोक्याचे असल्याचे अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी सांगितले.
देशातील किरकोळ महागाई दराने गेल्या ५ वर्षांतील उच्चांक गाठला आहे. डिसेंबर २०१९ मध्ये महागाईचा दर ७.३५ टक्क्यांवर झेपावला. तर, सलग तिसऱ्या महिन्यात चलनवाढ रिझव्र्ह बँकेच्या सुरक्षित मर्यादेपेक्षा (४ टक्के) वर नोंदवली गेली. २०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर ५.५४ टक्क्यांवर होता. सरकारच्या सांख्यिकी विभागाकडून समोर आलेल्या आकड्यांनुसार महागाईने डिसेंबर महिन्यात गेल्या ५ वर्षांतला उच्चांकी दर गाठला असल्याचे उटगी म्हणाले.
हेही वाचा - किरकोळ बाजारपेठेत ७.३५ टक्के महागाईची नोंद; पाच वर्षातील उच्चांक
सामान्य माणसाच्या दृष्टीने महागाई किती आहे? त्यातून आरबीआय आणि अर्थतज्ज्ञ धोरण ठरवत असतात. जर हा दर ५ टक्क्यांच्या खाली असला तर त्याला सामान्य समजले जाते. मात्र, डिसेंबरचा रिपोर्ट पाहता महागाई ७ टक्क्यांच्या वर गेली आहे. युद्धजन स्थिती भारताच्या बाहेर आणि आत देखील आहे. मात्र, अशा परिस्थितीत महागाई ही वाढतच जाणार आहे. अशा पद्धतीने महागाई वाढणे म्हणजे चलनवाढ होणार आणि त्याचा फटका सामान्य माणसाला बसणार आहे. जे संघटीत आहेत त्यांना आता नुकसान होणार असले तरी नंतर नुकसानभत्ता मिळणार आहे. मात्र, जे असंघटीत आहेत त्यांना मात्र नुकसान आहे, असेही उटगी यांनी सांगितले.
हेही वाचा - आयात कांद्याने वाढविली केंद्र सरकारची चिंता, कारण...