ETV Bharat / state

Uday Samant On Refinery Project : कोकणात रिफायनरी प्रकल्प होणारच - उद्योग मंत्री उदय सामंत - मँगो आणि मरीन पार्क

कोकणातील जनतेचा विरोध असला तरी, आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे कोकणात रिफायनरी होणारच असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. तसेच कोकणात हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Uday Samant
Uday Samant
author img

By

Published : Mar 29, 2023, 5:32 PM IST

Updated : Mar 29, 2023, 5:45 PM IST

रिफायनरी प्रकल्प होणारच - उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई : कोकणातील रिफायनरी प्रकल्पांना जनतेचा मोठ्या प्रमाणावर रोष पत्करावा लागतो आहे. जैतापूर पाठोपाठ बारसू येथील प्रकल्पलाही स्थानिक नागरिकांचा विरोध आहे मात्र आता स्थानिकांचा हा विरोध हळूहळू कमी होत असून या ठिकाणी कामे सुरू झाली आहेत गेल्या पंधरा दिवसांमध्ये आठ ते दहा बोर मारून झाले असून 32 लोकांनी समिती पत्र दिलेली आहेत. शेतकऱ्यांना जी काही भीती वाटते किंवा त्यांच्या ज्या काही शंका आहे त्या दूर करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहे. त्यामुळे कोकणामध्ये काही झाले तरी, रिफायनरी प्रकल्प होणारच असा दावा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.

कोकोकोला कंपनी रत्नागिरीत : कोको कोला ही जगप्रसिद्ध शीतपेयाची कंपनी आता रत्नागिरीतील लोटे परशुराम येथे आपला प्रकल्प उभारत आहे. त्याचे कामही सुरू झाला आहे. रत्नागिरी येथील एमआयडीसी आता वर्ग झाले आहेत. लोटे परशुराम वगळता जास्तीत जास्त एमआयडीसीमध्ये आता उद्योजक येऊ लागले आहे. केंद्र सरकारचा कोच बनवण्याचा कारखाना सुद्धा या एमआयडीसीत येतो आहे. रत्नागिरीतला एमआयडीसीमध्ये नवनवीन प्रकल्प यावे. जे आहे ते अधिक नेटाने सुरू राहावेत यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

रायगड मध्येही वेगवेगळे प्रकल्प : रायगड जिल्ह्यातही वेगवेगळ्या प्रकल्पांची सुरुवात झाली आहे. रायगडमध्ये बीडीपी हा प्रकल्प रद्द झाला असे, म्हटले जात होते. मात्र, तो आम्ही पुन्हा नव्याने सुरू करीत आहोत. सीनोरमस कंपनीचा वीस हजार कोटी रुपयांचा प्रकल्प येत आहे. महाराष्ट्रातील कौशल्य विकास विद्यापीठातली पहिले केंद्र पनवेल येथे सुरू होत, असून त्याचे भूमिपूजन नुकतेच झाले आहे. 5000 कोटी रुपयांचा विद्युत प्रकल्प जिंदालच्या वतीने कोकणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आता कोकणामध्ये नवनवीन प्रकल्प येत आहेत.

मँगो आणि मरीन पार्क : कोकणातील दापोली येथे सुमारे 500 एकर जमिनीवर प्रत्येकी दोनशे दोनशे कोटी रुपये प्रकल्प किंमत असलेल्या मरीन पार्क आणि मंगो पार्कची उभारणी करण्यात येणार आहे. कोकणातल्या आंबा बागायतदारांसाठी अतिशय उपयुक्त असा हा प्रकल्प होणार असून याच्यामध्ये आंब्यापासून तयार होणारे उपपदार्थ तयार करण्यात येणार आहेत. तसेच काजू बोंड. प्रक्रिया केंद्र हे सुद्धा उभारण्यात येत आहे. या ठिकाणी मोठे मरीन पार्क उभारण्यात येणार असून या प्रकल्पाच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय करणाऱ्या बांधवांना चालना देण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणात येत्या काही महिन्यात हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू होत आहेत. त्यामुळे राज्याबाहेर एखादा प्रकल्प गेला म्हणून आरडाओरड करण्यापेक्षा राज्यात किती नवीन प्रकल्प सुरू होत आहेत, याची दखल विरोधी पक्षांनी घ्यावी असेही सामंत म्हणाले.

हेही वाचा - Football Tournament 2023 : भारतीय फुटबाॅल संघाकडून अंतिम सामन्यात किर्गिजस्तान संघाचा पराभव

Last Updated : Mar 29, 2023, 5:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.