मुंबई : राज्यामध्ये जून महिन्याच्या 12 तारखेपासून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधले ऑनलाइन प्रवेश सुरू होणारा असून 15 जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. यंदा राज्यामध्ये दीड लाख औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठीच्या जागा आहेत. त्यासाठी लाखो विद्यार्थी आयटीआयसाठी प्रवेश करण्याची शक्याता आहे.
दीड लाखापेक्षा अधिक रिक्त जागांवर प्रवेश : महाराष्ट्र मध्ये गेल्या काही वर्षात कौशल्य प्रशिक्षणाकडे अधिक भर दिला गेलेला आहे. त्यामुळेच यंदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स पासून अनेक महत्त्वाचे तांत्रिक प्रशिक्षणाचे कोर्सेस देखील यामध्ये उपलब्ध असणार आहेत. कौशल्य प्रशिक्षण असल्याशिवाय रोजगार मिळणे, त्यात सातत्यपूर्ण टिकून राहणे हे शक्य नसते. त्यामुळेच महाराष्ट्रात 418 या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 95 हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांसाठी रिक्त जागा आहेत. तर 574 खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 59 हजार पेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. अशा मिळून एकूण दीड लाखापेक्षा अधिक या रिक्त जागांवर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश होतील.
विद्यार्थ्यांना प्रवेशाचे नियोजन असे आहे : 12 जूनला याबाबत ऑनलाईन प्रवेशाची सुरुवात झाली आहे. हि प्रवेश परिक्षा 11 जुलैपर्यंत सुरू राहील. त्यानंतर 19 जूनला कागदपत्रांची पडताळणी, तपासणी सरु होऊन 11 जुलै पर्यंत विद्यार्थ्यांना पडतळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर 19 जून ते 12 जुलै दरम्यान विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घ्यायचा किंवा नाही यासाठी मुदत दिली गेली आहे. प्राथमिक गुणवत्ता यादी 13 जुलैला जाहीर होईल. तर गुणवत्ता यादींवर हरकत घेण्यासाठी 13 जुलै व 14 जुलै असे दोन दिवस विद्यार्थ्यांसाठी दिलेले आहे. 15 जुलै या दिवशी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. 20 जुलैला पहिल्या फेरीची निवड यादी देखील जाहीर केली जाईल. प्रवेशासाठी 21 जुलै ते एक ऑगस्ट ते 10 ऑगस्ट पर्यंत मुदत दिली जाईल. प्रवेश फेरी दुसरी तिसरी चौथी जुलै, ऑगस्टमध्ये सुरू होईल.
वेबसाईटवर अधिक माहिती उपलब्ध: कम्प्युटर हार्डवेअर, नेटवर्क टेक्न एरोनॉटिकल ट्रस्ट, स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर, ड्रोन टेक्निशियन, पेंटर जनरल मेक मेकॅनिक, ऑटो बॉडी रिपेयर मेकॅनिक, ऑटो बॉडी पेंटिंग, कंप्यूटर प्रोग्रामिंग असे एकूण 83 अभ्यासक्रम यंदा उपलब्ध आहेत. एरोनॉटिकल, कम्प्युटरची निगडित काही विषयांवर यंदा अधिक भर देण्यात आलेला आहे. कारण विद्यार्थ्यांचा कल गेल्या काही वर्षात याकडे दिसत आहे. विद्यार्थ्यांनी अधिक तपशीलवार माहितीसाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी, असे अवाहन करण्यात येणार आहे.
www.https://admission.dvet.gov.in