ETV Bharat / state

Indian Navy Helicopter Crashed: मुंबईजवळ भारतीय नौसेनेचे हेलिकॉप्टर कोसळले, जीवितहानी नाही - प्रगत हलके हेलिकॉप्टर

भारतीय नौसेनेच्या एका हेलिकॉप्टरचा मुंबईजवळ अपघात झाला आहे. हे हेलिकॉप्टर मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याजवळ अचानकपणे कोसळले असून, या दुर्घटनेत पायलट बचावला आहे.

Indian Navys Advanced Light Helicopter crashes near the coast of Mumbai no casualties
मुंबईजवळ भारतीय नौसेनेचे हेलिकॉप्टर कोसळले, जीवितहानी नाही
author img

By

Published : Mar 8, 2023, 1:06 PM IST

Updated : Mar 8, 2023, 1:25 PM IST

मुंबई: भारतीय नौदलाचे प्रगत हलके हेलिकॉप्टर (ALH) मुंबईहून नियमित उड्डाण करत असताना किनार्‍याजवळ कोसळले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. शोध आणि बचाव मोहिमेद्वारे त्वरित शोध सुरू करण्यात आला आणि नौदलाच्या गस्ती पथकाद्वारे तीन सदस्यांच्या क्रूची सुरक्षित सुटका केली आहे. अधिकृत प्रवक्त्याने सांगितले की, अपघाताचे कारण स्पष्ट झाले नाही आणि भारतीय नौदलाने चौकशीचे आदेश दिले असल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

दुसऱ्या एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, भारतीय नौदलाचे प्रगत हलके हेलिकॉप्टर (एएलएच) तीन कर्मचार्‍यांसह नियमित उड्डाणासाठी बुधवारी मुंबई किनारपट्टीवर पाण्यात आपत्कालीन लँडिंग केले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. नौदलाच्या गस्ती पथकाने क्रूची सुटका केली, असे अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय नौदलाचे ALHची मुंबईत नियमित उड्डाणादरम्यान किनार्‍याजवळ आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. तात्काळ शोध आणि बचावामुळे नौदलाच्या गस्ती क्राफ्टद्वारे 3 जणांच्या क्रूना सुरक्षित वाचवण्यात यश आले असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. डिचिंग म्हणजे पाण्यावर आपत्कालीन लँडिंग होय. त्यानुसार आपत्कालीन परिस्थितीत या हेलिकॉप्टरला पाण्यावरच लँड करण्यात आले आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

  • Indian Navy ALH on a routine sortie off Mumbai ditched close to the coast.
    Immediate Search and Rescue ensured safe recovery of crew of three by naval patrol craft.
    An inquiry to investigate the incident has been ordered.

    — SpokespersonNavy (@indiannavy) March 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यावर्षी हेलिकॉप्टर झालेत दुर्घटनाग्रस्त: यंदाच्या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील अहोरे उपविभागाच्या पडर्ली गावात लष्कराच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. त्यानंतर लष्कराने स्पष्ट केले की, तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. लष्करी हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते आणि जोधपूरहून अबू रस्त्याकडे जात असताना हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करावे लागणार असल्याचे लक्षात आले. पायलटने हेलिकॉप्टर एका खाजगी शेतात उतरवले आणि हेलिकॉप्टर दुरुस्त करून परत उडेपर्यंत स्थानिक पोलिसांनी त्याचे संरक्षण केले.

हेलिकॉप्टरमध्ये होताहेत तांत्रिक बिघाड: गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अशाच एका घटनेत, तांत्रिक बिघाडामुळे भारतीय हवाई दलाच्या (IAF) हेलिकॉप्टरने हनुमानगढच्या शेतावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. त्याच महिन्यात नोंदवलेल्या दुसर्‍या एका घटनेत, गाग्रेट उपविभागाच्या वर उड्डाण करणारे भारतीय सैन्याचे चित्ता हेलिकॉप्टर नेहमीच्या प्रशिक्षण सोर्टी दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे नाक्रोह गावात आपत्कालीन परिस्थितीत उतरवण्यात आले होते.

हेही वाचा: बीबीसीच्या विरोधात गुजरातच्या विधानसभेत येणार प्रस्ताव

Last Updated : Mar 8, 2023, 1:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.