मुंबई : मंगळवारी वानखेडे स्टेडीअम, (Wankhede Stadium) चर्चगेट येथे भारत विरुद्ध श्रीलंका टी२० सामना (India Sri Lanka T20 Cricket Match) होणार आहे. क्रिकेटचा सामना बा क्रिडा प्रेमींसाठी पर्वणी असते. स्टेडियम मधे जाऊन सामना पाहणे आणि तेथिल वातावरणाचा आनंद घेण्यासाठी लोक गर्दि करतात. मंगळवारी ही हा सामना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमनार आहे. त्यामुळे क्रिडा रसीक आणि वाहनांचीही मोठ्या प्रमाणावर कोंडी होऊ शकते. त्याचा कोणालाही त्रास होऊ नये यासाठी पोलीसांनी अनेक मार्गात बदल केले आहेत. मंगळवारी दुपारी 3 ते रात्री 11.45 पर्यंत हे बदल लागू असणार आहेत.
मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त गौरव सिंग (DCP Gaurav Singh) यांनी वाहतुकीची कोंडी टाळण्या लोबतच सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्गात बदल केले आहेत. मुंबई मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम ११५ १९८८ चा अधिनियम ५९ व शासकीय अधिसुचने नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून वाहतुक मार्गात पुढिल प्रमाणे बदल करण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशा नुसार 'डी' रोड, 'सी' रोड, 'एफ' रोड, आणि 'एफ' क्रॉस रॉड, 'ई' रोड हा 'डी' रोड से 'सी' रोड जंक्शन, एन. एस. रोड उत्तर आणि दक्षिण वाहिनी सुंदर महल जंक्शन ते प्रिन्संग स्ट्रिट फ्लायओवर जंक्शन या या मार्गावर पार्किंग साठी निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार या रस्त्यावर वाहने पार्क करता येणार नाहीत. मोठया रस्त्यांवर वाहने पार्क केल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झालेली पहायला मिळते या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक राहणार असल्यामुळे या रस्त्यावर पार्किंगला निर्बंध असणार आहेत.
सुरक्षे सोबतच वाहतुक कोंडीतुन सगळ्यांनाच दिलासा मिळावा या साठी वाहतूकीच्या मार्गात पुढील प्रमाणे बदल सुचवण्यात आले आहेत यात डी रोड हा एक दिशा मार्ग जो पश्चिम पूर्व असा आहे तो आणि 'सी' रोड हा एक दिशा मार्ग पूर्व-पश्चिम तसेच ई रोड हा सर्व प्रकारच्या वाहनांकरीता डी रोड ते सी जंक्शन पर्यंत एक दिशा मार्ग दक्षिण वाहिनी असा असणार आहे. मार्गातील या बदलांची मुंबईकरांनी नोंद घेउन त्या प्रमाणे नियोजन केले तर वाहतुक कोंडिच्या समस्ये पासुन ते वाचु शकतील तेव्हा वाहन धारकांनी या बाबीची नोंद घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे.