ETV Bharat / state

Savarkar Gaurav Yatra: राहुल गांधींच्या निषेधार्थ आज मुंबईत भाजपची सावरकर गौरव यात्रा, काँग्रेसही देणार यात्रेनेच उत्तर - Savarkar Gaurav Yatra in Mumbai

राहुल गांधी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करत आहेत. भाजपकडून त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. म्हणूनच राहुल गांधींचा निषेध करण्यासाठी आणि सावरकरांचे कार्य पुन्हा एकदा जनतेसमोर आणण्यासाठी भाजप-शिवसेनेच्या वतीने मुंबईतील उत्तर पश्चिम, ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य, उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात येत आहे.

Savarkar Gaurav Yatra
भाजपच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरव यात्रेचा टीझर
author img

By

Published : Apr 2, 2023, 9:42 AM IST

मुंबई : सावरकर गौरव यात्रेची सुरुवात भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनात व अमित साटम यांच्या नेतृत्वात आज होणार आहे. या यात्रेसाठी भाजपकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील आधारित गौरव यात्रेचा टिझर प्रकाशित करण्यात आला आहे. काँग्रेस नेते, माजी खासदार राहुल गांधी हे वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्यावर काहीच बोलत नाहीत. ते सुद्धा मुकाट्याने हा अपमान सहन करत आहेत, असा आरोप भाजपने केला आहे.

पोस्टरला जोडे मारण्याचे काम : मोदी यांच्यावर टिप्पणी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावली. लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे खासदारकीचे सदस्यत्व रद्द केले. यानंतर सुद्धा घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये 'माफी मागायला मी काही सावरकर नाही,' असे सांगून राहुल गांधी यांनी पुन्हा या मुद्द्यावरून आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. आताच झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधान भवनाच्या पायऱ्यांवर राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारण्याचे काम भाजपच्या आमदारांकडून करण्यात आले. त्यावरून सुद्धा सभागृहात मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला होता.

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन : एकंदरीत आता हा विषय जनतेपर्यंत नेण्यासाठी, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनाची व त्यांच्या कार्याची महती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपकडून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची सुरुवात आजपासून मुंबईमध्ये होत आहे. यासाठी भाजपकडून सावरकरांच्या जीवनावर आधारित एका टिझरचे प्रकाशनही करण्यात आले आहे.

गौरव यात्रेला सन्मान यात्रेने उत्तर : भाजपकडून सावरकरांची गौरव यात्रा काढली जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसकडूनही पुढच्या महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सन्मानार्थ राज्यभर सन्मान यात्रा काढण्याचे आयोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे नाना पटोले यांनी असे सांगितले आहे की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 'सोनेरी पान,' हे जे पुस्तक लिहिले आहे त्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा कशा पद्धतीने अपमान केला आहे, याची माहिती सुद्धा जनतेपर्यंत ते पोहोचवणार आहेत. सावरकरांच्या गौरव यात्रेला प्रतिउत्तर म्हणून आता काँग्रेसकडून सुद्धा जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

हेही वाचा : Sharad Pawar on Savarkar : स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वीर सावरकरांचे योगदान नाकारता येणार नाही; शरद पवारांचे मोठे विधान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.