मुंबई: नुकतीच लाईव्ह स्ट्रिमिंगदरम्यान कोरियन युट्यूबरचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना खार पोलिसांनी अटक केली आहे. मोबीन चंद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सदरेलम अन्सारी या 2 तरुणांना लाइव्ह स्ट्रिमिंगच्या दरम्यान एका कोरियन युट्यूबरचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. खार पोलिसांनी आयपीसी कलम 354 अंतर्गत एफआयआर नोंदवला आणि दोघांनाही अटक केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. एकामागून एक घडणाऱ्या या घटनांनी मुंबई हादरून गेली आहे. त्यामुळे खरंच सर्वांना हवीहवीशी वाटणारी आणि सुरक्षित मुंबई परदेशी पाहुण्यांसाठी असुरक्षित बनू लागली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मायानगरी मुंबई सर्वांना सुरक्षित वाटते. अनेक पर्यटकांना आकर्षित करणारी मुंबई अलीकडे टवाळखोर आणि गुन्हेगारांची बनत चालली आहे. गेल्या १५ दिवसांत मुंबईत परदेशी पर्यटकांशी संबंधित तीन- चार घटना घडल्या आहेत. मुंबई पोलिसांनी Mumbai Police त्याची तातडीने दाखल घेऊन कारवाई केली. मात्र, ते आरोपी जामिनावर काही दिवसांतच सुटले. त्यामुळे कायद्याचा वाचक अशा समाजकंटकांना कसा बसणार आणि अशा समजविघातक गोष्टींना आळा बसणार कसा ? असे अनेक प्रश्न अनेकांना पडत आहेत.
पोलिसांचे मानले आभार: एक कोरियन तरुणी ऑनलाइन स्ट्रीमिंग करत असताना तिची छेडछाड काढल्याचा धक्कादायक प्रकार खार परिसरात घडला आहे. ती ज्या ठिकाणी ऑनलाइन स्ट्रिमिंग करत होती. त्यावेळी आसपासच्या काही टवाळखोरांनी तिची छेड काढताना तिच्यासोबत अश्लील वर्तन करताना दिसले. हा प्रकार खार परिसरात मंगळवारी रात्री घडल्याची माहिती पोलिसांनी दिली असून 2 तरुणांना अटक करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार गुरुवारी उघडकीस आला. या घटनेनंतर घाबरलेल्या तरूणीने रात्री ट्विट करून आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे. संबंधित तरूणीने मुंबई पोलिसांना मेन्शन करून ही बाब सर्वांसमोर आणली. पोलिसांनी आरोपींवर कारवाई केल्यानंतर या तरूणीने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहे. तरूणीने म्हटले आहे की, अशा प्रकारची घटना जगात कुठेही घडू शकते. ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत प्रवास करत आहे. ही फक्त एक घटना आहे. भारतासह इतर देशांतील लोकही मदतीसाठी पुढे आले आहे. मी मुंबई पोलिसांनी केलेल्या सहकार्यामुळे खूप खुश आहे. मी सर्वांचे आभार मानते.
अमेरिकन महिलेसमोर टॅक्सीचालकाचे अश्लील चाळे: कोरियन महिलेच्या छेडछाडी आधी काही दिवसांपूर्वी कामानिमित्त भारतात आलेल्या अमेरिकन महिलेसमोर टॅक्सीत अश्लील चाळे करण्याचा प्रकार शनिवारी घडला. या प्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी आरोपी चालक योगेंद्र उपाध्याय याला अटक केली आहे. अमेरिकन महिलेसमोर खाजगी टॅक्सीतला जास्त वर्तन करणारा योग्य केंद्र उपाध्याय या चालकाला डी एन नगर पोलिसांनी अटक केली. हा अंधेरी पश्चिम येथील जेपी रोडवर घडला होता. अमेरिकन महिला चालकाच्या बाजूच्या सीटवर बसली होती आणि तिच्यासमोरच चालकाने हस्तमैथुन करण्यास सुरूवात केली. हे पाहून महिला घाबरली आणि जे. पी. रोडवर गाडी थांबवण्यास सांगितले. ही बाब रस्त्यावरील लोकांना कळताच त्यांनी चालकाला पकडले आणि पोलिसांना कल्पना दिली. तक्रारदार महिलेने डीएन नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
परदेशी महिलेची केली पर्स लंपास: त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलिसांनी राधा सेठी नावाच्या महिलेला अटक केली. तिने रॅचेल ओर्म्सबी या न्यूझीलंडच्या महिलेची बॅग वेटिंग रूममधील लॉकरमधून पळवली होती. अशा प्रकारे परदेशी पर्यटक गुन्हेगारांच्या टार्गेटवर आहेत का ? असा देखील संशय व्यक्त केला जात आहे.
परदेशी पर्यटकांचे आकर्षण: भारतातील ऐतिहासिक वास्तूंसोबतच भारतातील सांस्कृतिक अनुभव घेण्यासाठी पर्यटकांचा ओढा भारताकडे वाढत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गिरगाव चौपाटीवर आतापर्यंत परदेशी पर्यटक येत होते. मात्र, आता हे प्रमाण वाढताना दिसत असले तरी गुन्हेगारांनी या पर्यटकांना आपले लक्ष्य तर केले नाही ना असा सवाल निर्माण होतो. गणेशोत्सवात फेटे, नवरात्रीमध्ये घागरा, धोती- अंगरखा घालूनही हे परदेशी पर्यटक फिरतात. भारतीय संस्कृतीने नाताळचा सण जसा आपला म्हणूनच स्वीकारला आहे. त्याचप्रमाणे ढोलताशे, गरबा, दिवाळीतील फराळ ही संस्कृती अनुभवण्यासाठी परदेशी पर्यटक उत्सुक असतात. गणेशोत्सवापाठोपाठ येणारा नवरात्रोत्सव आणि दिवाळी याचेही परदेशी पर्यटकांना आकर्षण असते. नवरात्रीसाठी घागरा- चोली, धोती- अंगरखा तसेच दागिने यांच्या खरेदीसाठी भुलेश्वरच्या गल्ल्यांमध्येही हे नागरिक फिरताना दिसतात.
भेट देण्यासाठी सर्वात चांगला महिना कोणता: देशभरात वेगवेगळ्या हवामान परिस्थितीचा अनुभव घेता, भारत भेट देण्याची उत्तम संधी ही स्थानिकांवर अवलंबून आहे. संपूर्ण वर्षभर मुंबईचे जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत असणारे तापमान आणि हवामान चांगले असते. या महिन्यांतील सुट्टीत पर्यटक मुंबईत येत असतात. तथापि, अत्यंत उष्णतेच्या दिवसांपासून आणि वादळी पावसापासून मोक्याचे अंतर राखायचे असेल, तर या महिन्यात पर्यटक प्रवास करणं पसंत करतात.