ETV Bharat / state

Measles Patients : राज्यात गोवरचे १२ हजार ५७० संशयित रुग्ण; मुंबईत गोवरमुळे सर्वाधिक मृत्यू - Measles hotspot

राज्यात गोवरच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ ( Increase in measles cases ) होत आहे. राज्यात आतापर्यंत १२ हजार ५७० गोवरचे संशयित रुग्ण ( Suspected measles patients ) आढळून आले आहेत. तर गोवरमुळे सर्वाधिक मृत्यू मुंबईत ( Maximum death due to measles in Mumbai ) झाले आहे.

Measles Patients
Measles Patients
author img

By

Published : Dec 2, 2022, 10:41 PM IST

मुंबई - राज्यात गेल्या ३ वर्षापेक्षा यंदा गोवरच्या रुग्णांच्या संख्येत वाढ ( Measles Patients Increase ) झाली आहे. राज्यात आतापर्यंत १२ हजार ५७० गोवरचे संशयित रुग्ण ( Suspected measles patients ) आढळून आले आहेत. ७९३ रुग्णांना निश्चित गोवर झाल्याचे ( Measles Patients ) निदान झाले आहे. तर १८ बालकांचा गोवरमुळे मृत्यू ( 18 children died due to measles ) झाला आहे. राज्यात मुंबई, मालेगाव, भिवंडी, ठाणे, पिंपरी चिंचवड हे जिल्हे गोवरचे हॉटस्पॉट ( Measles hotspot ) ठरले आहेत. राज्यात गोवरमुळे मुंबईत सर्वाधिक मृत्यू ( Maximum death due to measles in Mumbai ) नोंदवण्यात आले आहेत.

१२ हजार ५७० संशयित रुग्ण, १८ मृत्यू - राज्यात २०१९ मध्ये १३३७, २०२० मध्ये २१५०, २०२१ मध्ये ३६६८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर यावर्षी १ डिसेंबरपर्यंत १२ हजार ५७० संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. ७९३ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर १८ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी मुंबईत १२, भिवंडीत ३, ठाण्यात २ तर वसई विरार येथे १ मृत्यू झाला आहे. एकूण १८ मृत्यूंपैकी ० ते ११ महिन्याच्या ५, १२ ते २४ महिन्याच्या १०, २५ महिने ते ६० महिने म्हणजे ५ वर्षाच्या २ तसेच ५ वर्षावरील १ बालकाचा मृत्यू झाला आहे. १८ मृत्यूंपैकी ८ मुली तर १० मुलगे आहेत.

जिल्हानिहाय गोवरचा प्रसार - मुंबईत ४ हजार ३५५ संशयित रुग्ण असून ३७० निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मालेगाव मनपा येथे ८११ संशयित रुग्ण असून ७० निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. भिवंडी मनपा येथे ८८३ संशयित रुग्ण असून ४८ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे मनपा येथे ६१५ संशयित रुग्ण असून ४४ निश्चित निदान झाले आहेत. तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्हा येथे १३९ संशयित रुग्ण असून १५ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत.

वसई - विरार मनपा येथे २०४ संशयित रुग्ण असून ११ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर १ जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल मनपा येथे १६०, संशयित रुग्ण असून ५ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. नवी मुंबई मनपा येथे २५३ संशयित रुग्ण असून १२ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. औरंगाबाद येथे १२३ संशयित रुग्ण असून १२ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवड येथे २७९ संशयित रुग्ण असून ८ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. बुलढाणा येथे २४ संशयित रुग्ण असून २ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. मीरा भाईंदर येथे १७३, संशयित रुग्ण असून ३ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. रायगड येथे ११८ संशयित रुग्ण असून ६ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत.

१३ लाख लसींचा साठा - राज्यात गोवर प्रभावित विभागात १ हजार १८४ सर्व्हेक्षण पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ११ लाख ९४ हजार १३७ घरे सर्वेक्षण करण्यात आली आहेत. २८ हजार ४३४ बालकांना व्हिटामिन ए चा डोस देण्यात आला आहे. गोवर रुबेलाचा १० हजार २८८ बालकांना पहिला तर ७ हजार ९५४ बालकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. राज्यात एकूण १३ लाख ५३ हजार ८२० लसींचा साठा आहे.

केंद्र सरकार सूचना - देशभरात बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, केरळ आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये गोवरचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने परिस्थितीनुसार लसीकरणाचा निर्णय घ्यावा तसेच ६ महिन्यावरील बालकांना अतिरिक्त लसीचा डोस द्यावा अशा सूचना केल्या आहेत.

मुंबई - मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात गोवरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत निश्चित निदान झालेले एकूण ३७१ रुग्णांची तर ४ हजार ४३३ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. गोवर मुळे आतापर्यंत १५ मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १२ मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबई बाहेरील आहे. सध्या १६ रुग्ण ऑक्सीजनवर, ५ रुग्ण आयसीयुमध्ये तर ३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

ऑक्सीजनवर, ३ व्हेंटिलेटरवर - मुंबईत ६३ लाख २१ हजार ६३७ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले ४४३३ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे निश्चित निदान झालेले ३७१ रुग्ण आढळून आले आहेत. गोवर रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध रुग्णालयात ३३० बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी १०८ बेडवर रुग्ण असून २२२ बेड रिक्त आहेत. १४८ जनरल बेडपैकी ८७, १४७ ऑक्सीजन बेड पैकी १६, ३५ आयसीयु बेडपैकी ५ बेडवर रुग्ण आहेत. २० व्हेंटिलेटर असून त्यापैकी ३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

१६ हजार ६२३ मुलांचे लसीकरण - आतापर्यंत अतिरिक्त सत्रात १६ हजार ६२३ मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. ९ महिने ते ५ वर्षांपर्यंतच्या १ लाख ६२ हजार २९५ मुलांना लस देण्यात आली आहे. मुंबईत ९ ठिकाणी गोवरच्या पॉजीटीव्ह रुग्णांचे प्रमाण १० टक्के पेक्षा अधिक आहे अशा विभागातील ६ ते ९ महिन्यातील ३५६९ बालकांना लस देण्यात आली आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

मुंबईत १२ तर बाहेरील ३ मृत्यू - मुंबईमधील रुग्णालयात आतापर्यंत एकूण १५ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी १२ मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबईबाहेरील आहे. मुंबईमधील एकूण १२ मृत्यूपैकी ८ जणांचा मृत्यू गोवारमुळे झाला आहे. ४ जणांचा मृत्यू संशयित म्हणून नोंद झाला आहे. डेथ ऑडिट कमिटीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.