ETV Bharat / state

मुंबई : विधानसभा निवडणुक प्रक्रियेत प्रशासकीय स्तरावर महिलाराज; निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज - विधानसभा निवडणुक प्रक्रिया

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेत महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसत आहे. तसेच, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष प्रयत्नही केले जात आहेत.

उप जिल्हाधिकारी फरोग मुकादम
author img

By

Published : Oct 17, 2019, 4:06 AM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहरासह जिल्हा सज्ज झाला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेत महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसत आहे. तसेच, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष प्रयत्नही केले जात आहेत.

उप जिल्हाधिकारी फरोग मुकादम

यामध्ये पीडब्ल्यूडी ॲपवर आपले नाव नोंदवल्यावर दिव्यांगांसाठी घरपोच वाहन सेवा, युवकांमध्ये मतदानाबद्दल जागृतीसाठी ठीकठीकाणी फ्लॅश मोबचे आयोजन, अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारी पूर्ण झाल्याचे उप जिल्हाधिकारी फरोग मुकादम यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा - मतदार जनजागृती अभियान : मतदानाचा हक्क बजावा, सेलिब्रिटींचे आवाहन

यंदा निवडणुकीसाठी आयोगात प्रशासकीय अधिकारी तसेच केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून शैली किशनानी, सलमा फइम, शशिप्रभा द्विवेदी, मधू महाजन यांसारख्या महिला अधिकारी काम पाहत आहेत. तसेच निवडणूक आयोगाच्या मीडिया सेंटरसह इतर अनेक विभागांत महिला मोठ्या संख्येने काम करत आहेत.

Intro:मुंबई शहर जिल्हा विधानसभा निवडणूक प्रक्रियेत प्रशासकीय महिलाराज , निवडणुकीसाठी प्रशासन तयार

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्हा सज्ज असून विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेत महिला अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याने एक प्रकारे प्रशासकीय महिला राजच यंदा निवडणूक आयोगात काम करताना दिसत आहे. तसेच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्वांनी मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष भर देण्यात येत आहे. त्यामध्ये दिव्यांगांसाठी पीडब्ल्यूडी सारख्या च्या माध्यमातून मतदानासाठी घरपोच व्हीलचेअर येणार आहे. व युवकांनी मतदान करावे यासाठीदेखील फ्लॅश मोबचे आयोजन करण्यात येत आहे . प्रमाणे निवडणुकीसाठी प्रशासकीय प्रशासन तयार आहे याची माहिती उप जिल्हाधिकारी फरोग मुकादम यांनी ईटीव्ही भारताचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांना दिली.

Body:यंदा निवडणुकीसाठी आयोगात काम करणाऱ्या नियुक्त प्रशासकीय अधिकारी केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून शैली किशनानी, सलमा फइम, शशिप्रभा द्विवेदी ,मधू महाजन यासारख्या भारतीय पोलीस सेवेत काम करणाऱ्या महिला याठिकाणी मार्गदर्शन करीत आहेत तसेच निवडणूक आयोगाच्या मीडिया सेंटरमध्ये व निवडणूक मतदारसंघाय ठिकाणी व इतर अनेक येथे महिला काम करत आहेत . तसेच मुंबई शहर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरक मुकादम यांच्या सक्षम कार्य पद्धतीने लोकसभेची निवडणूक सुद्धा सहजतेने संपन्न होत आहे.

तसेच मुंबई शहर जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना मतदानासाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात यात आले आहेत. यामध्ये पीडब्ल्यूडी ॲप वर दिव्यांग आपले नाव नोंदवल्यावर त्यांना घरपोच आणण्यासाठी व नेण्यासाठी व्यवस्था निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेली आहे. तसेच युवकांना व वृद्धांना मतदानाविषयी जागृत करण्यासाठी कॉलेज तसेच मोक्याच्या ठिकाणी फ्लॅश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये पथनाट्य व मुलं नाटक करत मतदानाविषयी जागृकता करत आहेत.

Conclusion:लोकशाहीचा महत्त्वपूर्ण सण असलेल्या मतदान हे मोठ्या उत्साहात साजरा व्हावे. म्हणून निवडणूक आयोगाकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात येऊन मतदान करावे असे उपजिल्हाधिकारी फरक मुकादम यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.