मुंबई - शहरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. रोजची रुग्णसंख्या 5 ते 6 हजारावर गेली आहे. यार्श्वभूमीवर पालिकेने खासगी रुग्णालयातील बेड ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच 360 आयसीयूसह आणखी 2269 बेड उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
100 टक्के आयसीयू बेड ताब्यात
मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. जानेवारीपर्यंत कोरोनाला काही प्रमाणात आटोक्यात आणण्यात पालिकेला यश आले. मात्र, फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. मुंबईत येत्या सहा ते आठ आठवड्यात दिवसाला 10 हजार रुग्ण आढळून येतील. तसेच ही रुग्णसंख्या 21 हजारावर जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने तयारी केली आहे. 14 हजार असलेली बेडची संख्या 22 हजारावर नेली जाणार आहे. त्यासाठी पालिकेने खासगी रुग्णालयातील व प्रसूती गृहातील 80 टक्के खाटा व 100 टक्के आयसीयू खाटा ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.
2269 अतिरिक्त बेड
खासगी रुग्णालयातील 2269 अतिरिक्त बेड ताब्यात घेऊन कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध करून दिले आहेत. त्यात 360 आयसीयू बेडचा समावेश आहे. कोविड सेंटरमध्ये सध्या 3 हजार बेड रिक्त आहेत. 450 बेड खासगी रुग्णालयात रिक्त आहेत. जंबो कोविड सेंटर मधील 1500 बेड रिक्त असून ती संख्या 7 हजारावर नेणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
थेट बेड देऊ नका
रुग्णसंख्या वाढत असल्याने बेड मिळवण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक प्रयत्न करतात. मात्र, कोणालाही थेट बेड दिले जाऊ नयेत असे आदेश पालिका कार्यालय, रुग्णालयांना देण्यात आले आहेत. कोरोना चाचण्या करणाऱ्या लॅबकडून पालिकेकडे रात्री पॉझिटिव्ह रुग्णांची नावांची यादी रात्री येईल. त्यानुसार दुसऱ्या दिवशी सकाळी पालिका प्रशासन वॉर्ड वॉर रूमच्या साहाय्याने रुग्णांच्या घरी पोहचून त्यांना बेड उपलब्ध करून देण्यात येईल. बेडचे वाटप हे वॉर्ड वॉर रूमच्या माध्यमातूनच केले जाईल असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांत वाढ; पालिका प्रशासनाकडून 360 आयसीयूसह 2269 अतिरिक्त बेडची व्यवस्था - bmc latest news
खासगी रुग्णालयातील 2269 अतिरिक्त बेड ताब्यात घेऊन कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध करून दिले आहेत. त्यात 360 आयसीयू बेडचा समावेश आहे. कोविड सेंटरमध्ये सध्या 3 हजार बेड रिक्त आहेत. 450 बेड खासगी रुग्णालयात रिक्त आहेत.