मुंबई: कस्टम विभागाला गुप्तचर विभागाकडून हजारो बकरे हे गुजरातला जात असल्याचे समजले. मात्र 3332 बकरे हे तस्करी करून दुबईला नेण्याचा विचार होता. परंतु कस्टम विभागाने सापळा रचत कोस्ट गार्ड विभागाशी समन्वय करत, अखेर हे बकरे तस्करी करून बेकायदेशीर दुबईला नेण्याचा कट उघडकीस आणला आणि त्यांना रत्नागिरीमध्ये पकडले. 21 एप्रिल 2023 रोजी 3332 बकऱ्यांसहित रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रकिनारी कोस्ट गार्ड यांच्या सहभाग घेणे. दुबई जाणाऱ्या असलम दारू या व्यक्तीला बकऱ्यासकट पकडले होते. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 22 एप्रिल 2023 या दिवशी एकूण बकऱ्यांपैकी 66 बकरे वेगवेगळ्या आजारांनी मृत्यू झाल्या. असलम दोरू याला कोस्ट गार्ड यांच्याकडून 24 एप्रिल रोजी कायदेशीर अटक केली गेली. 25 एप्रिल रोजी स्थानिक न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले.
मॅजिस्ट्रेट कोर्टात अर्ज दाखल: परंतु कस्टम विभाग पकडलेल्या बकऱ्यांचे पुढे काय करणार? त्यामुळे कायदेशीर तरतुदीनुसार हे पकडलेले बकरे, एक तर संबंधित कायदेशीर संस्थेकडे दिले गेले पाहिजे किंवा बकरे विकले गेले पाहिजे. म्हणून न्यायदंडाधिकारी यांच्याकडे 26 एप्रिल 2023 रोजी अर्ज दाखल केला. 29 एप्रिल 2023 रोजी यामध्ये गौशाळा चालवणाऱ्या ध्यान फाउंडेशन यांचा प्रवेश झाला व त्यांनी हे बकरे त्यांच्या फाउंडेशनकडे मिळावे व ते त्याचे पालनपोषण करतील असे मॅजिस्ट्रेट कोर्टात अर्ज दाखल करत सांगितले.
बकरीचा ताबा फाउंडेशनकडे दिला: गौशाळा चालवणाऱ्या ध्यान फाउंडेशनने बोलल्याप्रमाणे बकऱ्यांना पालनपोषण करण्याचे काम वेळेत केलेच नाही. 29 एप्रिल 2023 रोजी न्यायदंडाधिकारी यांनी ऑर्डर मंजूर केली की, जेवढे बकरे पकडलेले आहे त्यांचा अंतरिम ताबा हा ध्यान फाउंडेशनकडे देण्यात यावा. त्या दिवशी शनिवार होता. ऑर्डर मंजूर झाली आणि ध्यान फाउंडेशनने सर्व बकरे घेऊन जावे असे ते आदेशामध्ये म्हटले होते.
फाउंडेशनकडून उत्तर नाही: 29 एप्रिल 2023 पासून 10 मे 2023 पर्यंत, गौशाळा चालवणाऱ्या ध्यान फाउंडेशन यांच्याकडून बकऱ्यांच्या संदर्भात कोणतीही प्रक्रिया किंवा पाऊल उचलले गेले नाही. त्यामुळे कस्टमर विभागाने चार मे 2023 रोजी आपल्याला मॅजेस्ट्रेट यांच्या निकालानुसार हे बकरे आपल्याकडे देण्याची अंतरी ऑर्डर आहे. त्यामुळे आपण घेऊन जावे आम्ही वाट पाहत आहोत. परंतु मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणि दुसऱ्या आठवड्यात कोणतेही उत्तर ध्यान फाउंडेशनकडून आलेले नाही. ही बाजू कस्टम विभागाच्या वकील एडवोकेट मिश्रा यांनी जोरदारपणे मांडली.
बकऱ्यांसाठी कस्टम: वेळेमध्ये ध्यान फाउंडेशन यांच्याकडून न्यायालयाने ताबा दिलेल्या असतानाही, कुठलाही ताबा त्यांनी घेतला नाही. त्यामुळे जे मूळ अल्मदिना बकऱ्यांच्या खरेदी विक्री व्यवहार करणारी कंपनी होती, त्यांनी खालच्या मॅजिस्ट्रेट यांच्या निकालाला मे महिन्यात आव्हान दिले. रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली त्या सत्र न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निकाल रद्द केला. अल्मदिना यांची मागणी मान्य केली. तसेच कस्टम विभागाला त्यांच्या संदर्भातील कायद्यातील कलम 110 नुसार उचित कारवाई करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी कारवाई करावी असे देखील सत्र न्यायालयाच्या निकालामध्ये म्हटले आहे. मग जेवढे उरलेले बकरे आहेत, त्या बकऱ्यांसाठी कस्टम विभागाच्या अधिनियमानुसार कलम 110 नुसार उचित कारवाई करून, बकरे ज्याला हवे त्यांना योग्य वैद्यकीय अहवाल आधी तयार करून मग ते बकरे विकू शकता. या नियमामुळे न्यायदंडाधिकारी यांनी ऑर्डर दिली होती.
हेही वाचा -