ETV Bharat / state

अँटिलिया प्रकरणी मोठा खुलासा; मनसुख हिरेनने दिली होती सचिन वाझेला स्कॉर्पिओची चावी

सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्या भेटीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. तसेच, मनसुखनेच वाझेला आपल्या स्कॉर्पिओची चावी दिल्याचेही समोर आले आहे.

sachin vaze
सचिन वाझे
author img

By

Published : Mar 29, 2021, 12:54 PM IST

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीच्या बाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणातील एकमात्र साक्षीदार मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास राष्ट्रीय तपाय यंत्रणा (एनआयए) करीत आहे. आता एनआयएच्या हाती मोठी माहिती लागली आहे. मनसुख व सचिन वाझे यांच्यामध्ये 17 फेब्रुवारी रोजी 9 मिनिटांची भेट झाली होती. याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत. तर, वाझेला हिरेन यांनी स्कॉर्पिओ गाडीची चावी दिली होती, असेही समोर आले आहे.

सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्या भेटीचा सीसीटीव्ही
काय घडलं 17 फेब्रुवारीला ? -एनआयएच्या हाती लागलेले सीसीटीव्ही फुटेज मुंबईतील वालचंद हिराचंद मार्ग येथील हॉटेल शिवाला जवळील सिग्नलवर थांबलेल्या एका मर्सिडिज गाडीचे आहेत. ही गाडी एनआयएच्या अटकेतील आरोपी सचिन वाझेची असल्याचे समोर आले आहे. 17 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजून 35 मिनिटांनी वालचंद हिराचंद मार्ग येथील सिग्नलवर मनसुख काळ्या रंगाच्या मर्सिडिजमध्ये बसताच. या गाडीत सचिन वाझेसोबत बसल्यावर ही गाडी GPO सिग्नलवर काही मीटर अंतरावर जाऊन थांबते. तब्बल 9 मिनिटे गाडीत सचिन वाझे सोबत चर्चा करून हिरेन पुन्हा खाली उतरून रस्ता पार करून पायी चालत जातात. नंतर वाझेच्या गाडीने यु टर्न घेतल्यानंतर पुन्हा हिरेन गाडी जवळ जाऊन काही तरी बोलतात, असे या फुटेजमध्ये दिसत आहे.

हिरेन यांनी दिली वाझेला स्कॉर्पिओ गाडी -
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या दाव्यानुसार, सचिन वाझेला हिरेन मनसुख यांनी विक्रोळी हायवेवर सोडलेल्या स्कॉर्पिओ गाडीची चावी दिली होती. या नंतर सचिन वाझेने हिरेनला दुसऱ्या दिवशी विक्रोळी पोलीस ठाण्यात जाऊन वाहन चोरीची तक्रार दाखल करण्यास सांगितले होते. या नंतर विक्रोळी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना वाहन चोरीचा गुन्हा दाखल करून घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप एनआयएने केला आहे. या संदर्भात विक्रोळी पोलीस ठाण्याच्या काही अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. या बरोबरच मुंबई पोलीस खात्यातून अंतर्गत चौकशी सुद्धा सुरू असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा - पोटदुखीच्या त्रासामुळे शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

हेही वाचा - बोला आता... पोलिसानेच दिला पत्नीला तीन तलाक; 'एमपीएससी'साठी 10 लाख रुपये आणण्याचा तगादा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.