ETV Bharat / state

निर्बंध वाढणार मात्र टप्प्याटप्प्याने काही निर्बंध कमी करणार - कोरोना बातमी

कोरोना रुग्ण संख्या असलेल्या जिल्ह्यांमधील कडक निर्बंधांमध्ये टप्प्यटप्प्याने काही आवश्यक बाबतीत निर्बंध कमी केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

मुख्यमंत्री
मुख्यमंत्री
author img

By

Published : May 27, 2021, 8:54 PM IST

मुंबई - एक जूननंतर राज्यात निर्बंधांमध्ये कायम राहण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. मात्र, राज्यातील निर्बंधाचे नियम टप्प्याटप्प्याने शिथिल केले जातील, असेही मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे. आज (दि. 27 मे) राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत निर्बंधांबाबत चर्चा झाली असून, राज्यात निर्बंधांचा कालावधी वाढण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मात्र, 1 जूननंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने काही आवश्यक बाबतीत निर्बंध कमी केले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्यात रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होत असला तरी 10 ते 15 जिल्ह्यांत रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. शिवाय म्युकरमायकोसिसचा धोकाही वाढतो असून, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या उच्चांक पातळीवर पोहोचली होती. आजची राज्यातील रुग्ण संख्या कमी होऊन सप्टेंबरच्या आकडेवारी एवढी झाली आहे. त्यामुळे एकदम निर्बंध न उठवता ते 1 जूननंतर वाढवून टप्प्याटप्प्याने काही आवश्यक बाबतीत निर्बंध कमी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

राज्यात आता 3 लाख 15 हजार एवढी रुग्ण संख्या आहे. दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीनंतर राज्यातील रुग्णांची आकडेवारी ही 8 लाखापर्यंत गेली होती. मात्र आता 3 लाखापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत निर्बंध उठवणे शक्य नसून, ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या कमी होत आहे. तिथे निर्बंध शिथील करण्याबाबत टास्क फोर्ससोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

लसीकरणासाठी दुसऱ्या डोसला प्राधान्य

सध्या राज्यामध्ये लसींची तुटवडा आहे. त्यामुळे राज्य सरकार केवळ 45 वर्षे वयोगटावरील लोकांना दुसरा डोस देण्यासाठी प्राधान्य देत आहे. लसीकरणाबाबत ग्लोबल टेंडर काढले असले तरी अद्याप प्रतिसाद नाही. तसेच विदेशी कंपन्यांची लसींची किंमत सातशे ते अठराशे रुपयांपर्यंत आहेत. या किंमती प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे देशात राज्याराज्यांमध्ये लसींची वेगवेगळी किंमत असण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालून केंद्राने ग्लोबल टेंडर काढावे. त्यानंतर राज्यामध्ये केंद्र सरकारने लस पुरवाव्यात जेणेकरून लसींची किंमत एकच राहील, अशी मागणी देखील आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून करण्यात आली.

रुग्णसंख्या वाढलेल्या जिल्ह्यातील रुग्णांवर कोविड सेंटरमध्येच होणार उपचार

मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली असून महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रत्येक रुग्णांचा उपचार खर्च राज्य सरकार करणार आहे. यासाठी राज्याचा नागरिक असलेल्या रुग्णाला उपचार घेता येणार आहेत. यासाठी रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे. राज्यात 21 जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये रुग्णांनी होम आयसोलेशन न होता, थेट कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन उपचार घ्यावेत, असेही आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून करण्यात आले आहे.

चंद्रपुरातील दारू बंदी उठवली

चंद्रपूर जिल्ह्यात असलेली दारूबंदी आज (दि. 27 मे) उठवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा - कोरोनाच्या चुकीचा अहवालामुळे मराठी दिग्दर्शकाला मनस्ताप, महापालिकेकडे तक्रार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.