मुंबई : मुंबईमध्ये बहुसंख्य इमारती जुन्या झाल्या आहेत. इमारत जुन्या झाल्याने त्या पडण्याची भीती असल्याने पुनर्विकास केला जात आहे. अशा बहुसंख्य इमारतींचा पुनर्विकास मुंबईमध्ये सुरु आहे. काही इमारतींची कामे आहेत. इमारतींचा पुनर्विकास करताना त्या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना पार्किंगची जागा देणे बंधनकारक केले आहे. मात्र, बहुसंख्य पुनर्विकास झालेल्या इमारतीमधील रहिवाशांना केवळ चार चाकी वाहनांसाठी पार्किंगची जागा उपलब्ध करून दिली जाते. दुचाकी वाहनांना पार्किंगची जागा उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे दुचाकी रस्त्यावर पार्क कराव्या लागत आहेत.
दुचाकी वाहने रस्त्यावर पार्क : याबाबत इमारतींचा पुनर्विकास करणाऱ्या विकासकांशी संपत साधला असता, खासगीमध्ये सांगताना आम्ही जितक्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध असतात त्या रहिवाशांना देतो. एक चार चाकी वाहन पार्कींगची जागा दहा लाख रुपये पार्किंग शुक्ल आकारले जाते. पार्कींगच्या जागा घेण्यासाठी लागणारे शुल्क दुचाकी वाहन मालक भरत नाहीत. त्यामुळे त्यांना पार्किंगची जागा मिळत नाही अशी माहिती दिली. तर, आम्ही घर घेतले माग त्यासोबत पार्कींगची जागाही मिळायला हवी. परंतु, असे होत नसल्याने आम्हाला रस्त्यावर दुचाकी वाहने पार्क करावी लागतात असे रहिवाशाचे म्हणणे आहे.
जागा तितकीच पार्किंग : याबाबत मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला इमारतीच्या मोजमाप करून त्या इमारतीच्या जागेत किती वाहने पार्क केली जाऊ शकतात, त्याप्रमाणे पार्कींग केल्या जाणाऱ्या वाहनांची संख्या ठरावी जाते. वाहन पार्किंगसाठी लागणारे शुल्क दुचाकी वाहनांचे मालकांसाठी जास्त आहे. त्यामुळे ते शुल्क भरू शकत नाहीत. यामुळे ते रस्त्यावर वाहने पार्क करत असावेत अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पार्किंग ही मुंबईमधील मोठी समस्या : मुंबईमध्ये ३० लाख वाहने असून, त्यापैकी १० लाख वाहने रस्त्यावर कशीही उभी असतात. त्यामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण होते. मी स्वत: पालिकेच्या पार्किंग अथॉरिटीचा सदस्य होतो. मात्र, पालिका पार्किंगसाठी काहीही करत नसल्याचे दिसत आहे. पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी पालिका आणि राज्य सरकराने एकत्र येऊन समस्या सोडवण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया वाहतूक तज्ज्ञ अशोक दातार यांनी दिली आहे.
हेही वाचा : आमदार संजय शिरसाटांना 'ते' वादग्रस्त वक्तव्य पडणार महागात; महिला आयोगाने घेतली गंभीर दखल