ETV Bharat / state

Plastic Ban In State : मुंबईत साडे तीन वर्षांत पावणे दोन लाख किलो प्लास्टिक जप्त, ५ कोटीची दंड वसुली - fine of Rs 5 crore was recovered

राज्यात प्लास्टिक बंदीचा (Plastic Ban In State) करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) प्रतिबंधित प्लास्टिक आढळून येणाऱ्या व्‍यापारी, फेरीवाले यांच्यावर कारवाई केली जात आहे. या कारवाईनुसार जून २०१८ ते जानेवारी २०२२ या साडे तीन (in three and a half years) वर्षांच्या कालावधीत पालिकेने पावणे दोन लाख किलो प्लास्टिक जप्त (quintals of plastic were seized ) करत ५ कोटी ३६ लाखांची दंड (fine of Rs 5 crore was recovered) वसुली करण्यात आली आहे.

author img

By

Published : Mar 18, 2022, 3:25 PM IST

मुंबई: प्रत‍िबंधित प्‍लास्टिकचा नागरिकांनी वापर करु नये, यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेद्वारे (Mumbai Municipal Corporation) नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात येते. तसेच प्रत‍िबंधित प्‍लास्टिकचा वापर करत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. यानुसार जून २०१८ ते जानेवारी २०२२ या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान १ लाख ७५ हजार ४२८ किलो प्लास्टिक जप्त (quintals of plastic were seized ) करण्यात आले. यापोटी ५ कोटी ३६ लाख ८५ हजार इतकी दंड वसुली (fine of Rs 5 crore was recovered) करण्यात आली आहे. या अनुषंगाने पर्यावरणाच्या रक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सातत्याने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा भाग म्हणून ‘प्रतिबधित प्लास्टिक’ विरोधी कारवाई आता अधिक प्रभावी करण्यात येत आहे. सर्व नागरिक, व्‍यापारी, फेरीवाले यांनी ५ हजार ते रुपये २५ हजार पर्यंतची दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी प्रतिबंधित प्‍लास्टिकचा वापर करु नये असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

काय आहे प्लास्टिक बंदीचा नियम
महाराष्‍ट्र शासनाच्‍या दिनांक २३ मार्च २०१८ च्या अधिसुचनेनुसार संपूर्ण महाराष्‍ट्रात प्रतिबंधित प्‍लास्टिकवर (उत्‍पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी साठवणूक) बंदी घातलेली आहे. या अंतर्गत प्रतिबंधित प्‍लास्टिकपासून बनवल्या जाणा-या पिशव्या (हॅण्‍डल असलेल्या व नसलेल्या), प्‍लास्टिकपासून बनविण्यात येणार्‍या व एकदाच वापरल्या जाणार्‍या टाकाऊ वस्तू जसे की ताट, कप, ताटल्या (प्लेट), पेले (ग्लास), चमचे इत्‍यादीसह हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणार्‍या प्रतिबंधित प्‍लास्टिकच्या वस्तू, द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे कप किंवा पाऊच व सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य इत्‍यादी साठविण्यासाठी आणि पॅकेजिंगसाठी प्रतिबंधित प्‍लास्टिकच्या वापरावर बंदी घातलेली आहे.

अशी होते कारवाई
प्रतिबंधित प्‍लास्टिक आढळल्यास
प्रथम गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये दंड
दुसर्‍या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये दंड
तिसर्‍या गुन्ह्यासाठी २५ हजार रुपये दंड व ३ महिन्यांची कैद

हेही वाचा : राणीबागेला ४ महिन्यात ६ लाख पर्यटकांची भेट, अडीच कोटींचा महसूल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.