ETV Bharat / state

मुलुंडमध्ये मनसेने उभारले २४ तास सेवा देणारे कोविड वॉररूम - मुलुंड कोविड वॉर रूम

या वॉररूममधून रुग्णालयात रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, ऑक्सिजनची व्यवस्था करून देणे, औषधे कुठे मिळतील याची माहिती देणे, गृह विलगीकरणमध्ये असलेल्या कुटुंबांना मोफत जेवणाची व्यवस्था करून देणे, अशा विविध सोयी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

मनसेचे मुलुंड येथिल कोवीड वॉर रूम
मनसेचे मुलुंड येथिल कोवीड वॉर रूम
author img

By

Published : Apr 27, 2021, 7:21 PM IST

मुंबई - सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांना वेळेत बेड, रुग्णवाहिका, औषधे आणि ऑक्सिजन मिळविण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे.यासाठी नेमके कोणाला विचारपूस करावे हे देखील लवकर समजत नाही. हीच बाब लक्षात घेत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला आहे.मुलुंडमध्ये नागरिकांसाठी मनसेने २४ तास सेवा देणारे मुलुंड मनसे कोविड वॉररूम उभारले आहे.मुलुंडच्या केशव पाडामध्ये हे वॉररूम उभारण्यात आले आहे.

'या सुविधांचा केला जातो पुरवठा'

या वॉररूमचे नंबर समाज माध्यम आणि फ्लेक्सद्वारे नागरिकांमध्ये पोहचविण्यात आले आहेत. या वॉररूममधून रुग्णालयात रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, ऑक्सिजनची व्यवस्था करून देणे, औषधे कुठे मिळतील याची माहिती देणे, गृह विलगीकरणमध्ये असलेल्या कुटुंबांना मोफत जेवणाची व्यवस्था करून देणे, अशा विविध सोयी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही सावंत यांनी सांगितले आहे.

'अशा प्रकारची व्यवस्था सगळीकडे उभारणार'

सध्या पालिका, शासन चांगले काम करत आहे मात्र, रुग्णांची संख्या इतकी वाढली आहे की सगळ्यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून मदत करणे गरजेचे आहे, म्हणून आम्ही आता मुलुंडमधून हे वॉररूम सुरू केले असून मुंबईत बऱ्याच ठिकाणी असे कक्ष उभारणार आहोत, असे मनसे नेते शिरीष सावंत यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.