ETV Bharat / state

Sharad Pawar Political Decisions : पक्षाविरोधातच केले होते बंड; शरद पवारांचे 'हे' महत्वपूर्ण राजकीय निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज राजकारणातून निवृत्ती घेतली. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत काही निर्णय घेतले. त्यामुळे त्यांची कारकीर्द गाजली. त्यातील काही महत्वाचे राजकीय निर्णय आणि त्यांच्या राजकारणाला मिळालेले वळण याची थोडक्यात माहिती घेऊयात.

Sharad Pawar
Sharad Pawar
author img

By

Published : May 2, 2023, 3:14 PM IST

Updated : May 2, 2023, 4:10 PM IST

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणावर शरद पवार या नावाचे गेली ५० वर्षाहून अधिक काळ गारूड राहिले आहे. शरद पवारांची निर्णय घेण्याची एक वेगळीच अशी खास पद्धत आहे. त्यांच्याबद्दल असे बोलले जाते की पवार जे बोलतात ते कधीच करत नाहीत. मात्र जे बोलत नाहीत ते मात्र ते नक्कीच करतात. काही बाबतीत लोकांचे हे मत खरेही मानता येईल. शरद पवार यांनी प्रदीर्घ राजकीय जीवनात काही महत्वाचे निर्णय घेतले. त्यामुळे राज्याचे राजकारणच बदलले. त्याबाबत इथे माहिती घेऊयात.

शरद पवारांचे पक्षाविरोधात बंड - आणीबाणी नंतर काँग्रेसमध्ये फूट पडली. इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस असे दोन भाग काँग्रेसचे झाले यामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्यासह शरद पवार आणि महाराष्ट्रातील अनेक नेते काँग्रेसमध्ये दाखल झाले. 1978 मध्ये काँग्रेसमधील १२ आणि इतर मिळून शरद पवार 40 समर्थक आमदारांसह बाहेर पडले. त्यांनी त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप खुद्द पाटील यांनीच केला होता. आजही हा आरोप त्यांच्या पिच्छा सोडत नाही. त्यावेळी एस काँग्रेस स्थापन करुन पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. सत्तेमध्ये पुलोदचा तो पहिला राजकीय प्रयोग पवारांनी राज्यात राबवला.

काँग्रेसमध्ये घरवापसी - शरद पवार 1980 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर राजीव गांधी यांच्या आवाहनानंतर शरद पवार यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये घर वापसी केली. ते खासदार झाले. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना केंद्राच्या राजकारणात स्थान देऊन शरद पवार यांना राजीव गांधी यांनी 1988 मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना - राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रे गेली. मात्र सोनिया गांधींचे आणि शरद पवारांचे जमले नाही. त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. १० जून १९९९ रोजी शरद पवारांनी त्यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची' स्थापना केली. 1999 मध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र झाल्या. विधानसभा निवडणुकींनंतर कोणत्याही पक्ष अथवा आघाडीस बहुमत मिळाले नाही. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले.

पंतप्रधान पदाला हुलकावणी - राज्यात १९९९मध्ये त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात चांगलेच यश मिळाले. त्यानंतर 2004 मध्ये यूपीएचे सरकार राज्यात आले. यावेळी शरद पवारांना पंतप्रधान पदाची संधी होती. मात्र ते काँग्रेस पक्षात नसल्याने त्यांना ती मिळाली नाही. काँग्रेस सोडल्याच्या निर्णयामुळे मोठी संधा शरद पवार यांनी गमावली असे मानण्यात येते. मात्र शरद पवार यांनी दहा वर्ष केंद्रात कृषी मंत्री पद सांभाळले.

महाविकास आघाडीची स्थापना - 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यांमध्ये निर्माण झालेल्या राजकीय सत्ता स्थापनेच्या पेच प्रसंगामध्ये शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका निभावत महाविकास आघाडीची स्थापना केली. शरद पवार यांनी स्थापन केलेल्या या आघाडीमध्ये परस्पर विरोधी विचारांचे पक्ष म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले. राष्ट्रवादीबरोबर या दोन्ही पक्षांनी आघाडीत अडिच वर्षे राज्य केले.

हेही वाचा - Sharad Pawar Profile - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची झंझावाती राजकीय कारकीर्द

Last Updated : May 2, 2023, 4:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.