ETV Bharat / state

Gold Smuggler in Mumbai : महिला हवालदारानेच वर्दीला फासला 'काळीमा';  ३५ लाखांचे तस्करीचे सोने आढळल्यानंतर सेवेतून बडतर्फ

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करी मोठ्या प्रमाणात चालते. आता या तस्करांना पोलीस प्रशासनाकडून देखील साथ मिळत असल्याचे दिसत आहे. नुकतेच एक महिला हवालदार सोने तस्करांना मदत करत असल्याची घटना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. त्यामुळे या महिला हवालदाराला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

Mumbai Crime News
सोने तस्करांना मदत
author img

By

Published : Jul 19, 2023, 6:54 AM IST

Updated : Jul 19, 2023, 7:17 AM IST

मुंबई : सोने तस्करीच्या घटना अलीकडे मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे चित्र आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन विभागात काम करणाऱ्या आणि सुमारे 35 लाख रुपयांच्या सोने तस्करी प्रकरणात गुंतलेल्या एका महिला हवालदाराला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खाक्या वर्दीला काळीमा लागला आहे. बडतर्फ केलेल्या महिला हवालदाराचे नाव संध्याराणी चव्हाण असे आहे.

संध्याराणी चव्हाण या बडतर्फ महिला हवालदाराने इमिग्रेशन विभागात कार्यरत असताना तस्करीचे सोने घेतले असल्याचे तिच्यावरती ठपका आहे. संध्याराणी चव्हाण मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा 2 मध्ये कार्यरत होती. याच विभागातील पोलीस कर्मचारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन विभागात काम करत असतात.

सोने तस्करी केल्याची माहिती : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात थायलंड येथून आलेल्या एका प्रवाशाने सोने तस्करी केल्याची माहिती विमानतळावरील कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिट म्हणजेच एआययुला मिळाली होती. त्यानुसार या प्रवाशावर कस्टम विभागाचे अधिकारी पाळत ठेवून होते. या प्रवाशाला कस्टमर अधिकाऱ्यांनी अटक केली, तेव्हा या महिला हवालदाराने आपल्याला मदत केल्याची माहिती त्या प्रवाशाने चौकशीत दिली. त्यानुसार महिला हवालदार संध्याराणी चव्हाण हिची झडती घेण्यात आली. तेव्हा तिच्या ताब्यात थायलंड येथून आलेल्या प्रवाशांनी तस्करी केलेल्या सोन्यापैकी 685 ग्राम सोने आढळून आले. जप्त केलेल्या सोन्याची किंमत 35 लाख 50 हजार इतकी आहे.

सोने तस्करीत महिला हवालदाराचा सहभाग : कस्टम विभागाने सोने तस्करी आणि या महिला हवालदाराचा त्यात असलेल्या सहभाग याचा एक सविस्तर अहवाल तयार केला. तो मुंबई पोलिसांना सादर केला होता. या घटनेनंतर तिला सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर तिची विभागीय चौकशी करण्यात आली. मात्र, त्यात तिला कोणतेही समाधानकारक उत्तर देता आले नाही. म्हणून शेवटी तिला मुंबई पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हवाई मार्गाने सोने तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. कोट्यवधी रुपयांचे सोने मुंबई विमानतळावर एअर इंटेलिजंट युनिट (एआययू) आणि कस्टम विभागाने जप्त केले आहे.

हेही वाचा :

  1. BMC Suspended Officers: बीएमसीचे 'हे' 116 निलंबित अधिकारी आहेत ऑन ड्युटी; बीएमसीचा अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न- जितेंद्र घाडगे
  2. Pune Student attack: विद्यार्थिनीवरील हल्ल्यानंतर तीन पोलीस कर्मचारी निलंबित, 'ती' मोठी चूक भोवली!
  3. Thane crime news : आधारवाडी कारागृहात कैद्यांकडे १५ मोबाईल प्रकरणी कारागृह अधीक्षक निलंबित

Last Updated : Jul 19, 2023, 7:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.