ETV Bharat / state

श्रीसिद्धिविनायक गणेश मूर्तीचे हायड्रॉलिक पाण्याच्या टाकीत विसर्जन - सिद्धीविनायक मूर्ती विसर्जन

गणेश मूर्तीची मिरवणूक न काढता इंजिनिअर आशिष घाग यांच्या संकल्पनेतून अत्याधुनिक हायड्रॉलिक पाण्याच्या टाकीमध्ये श्री सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणामध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

श्रीसिद्धिविनायक गणेश मूर्तीचे हायड्रॉलिक पाण्याच्या टाकीत विसर्जन

author img

By

Published : Aug 28, 2020, 9:55 PM IST

मुंबई - गेले सात दिवस मनोभावे पूजा करून आज श्री सिद्धिविनायक गणेश मूर्तीचे हायड्रॉलिक पाण्याच्या टाकीत श्रीसिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणामध्ये विसर्जन करण्यात आले. यावेळी 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या गजराने परिसर दुमदुमला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही 7 दिवस श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात भाद्रपद गणेशोत्सवानिमित्त गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीमध्ये ठराव करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी उत्सव साधेपणाने साजरा करण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला.

श्रीसिद्धिविनायक गणेश मूर्तीचे हायड्रॉलिक पाण्याच्या टाकीत विसर्जन

यावेळी गणेश मूर्तीची मिरवणूक न काढता इंजिनिअर आशिष घाग यांच्या संकल्पनेतून अत्याधुनिक हायड्रॉलिक पाण्याच्या टाकीमध्ये श्री सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणामध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यावेळी न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर (राज्यमंत्री दर्जा) तसेच कोषाध्यक्ष सुमंत घैसास, सर्वश्री विश्वस्त संजय सावंत, महेश मुदलियार, आनंद राव, सुबोध आचार्य, कार्यकरी अधिकारी प्रियांका छापवाले, उप कार्यकारी अधिकारी अभिनंदन मोरे व ज्येष्ठ पुजारी बाळकृष्ण सप्रे उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.