मुंबई- शहरात शुक्रवार-शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने 2005 मध्ये 26 जुलैला झालेल्या पावसाची आठवण करून दिली. शुक्रवारी सकाळपासून ते शनिवारपर्यंत पडलेल्या पावसाची सरासरी दहा वर्षाच्या जुलै महिन्यात पडलेल्या पावसापेक्षा जास्त होती. सध्याचे वातावरण पाहता पुढील तीन दिवस मुंबईमध्ये संततधारेची शक्यता आहे, असे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.
पावसाचा जोर आजही असू शकतो, असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या चारही जिल्ह्यांना यासंदर्भात रेड अलर्ट देण्यात आला आहे. या चारही जिल्ह्यांमध्ये सोमवारी मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. मंगळवारपर्यंत ३० जुलैला पावसाचा जोर थोडा कमी होऊ शकतो.असेही हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.