ETV Bharat / state

कोरोनीलच्या वापराला आयएमए महाराष्ट्राचाही विरोध; केंद्राला पाठवले पत्र - आयएमए महाराष्ट्र बातमी

महाराष्ट्र आयएमएने कोरोनील हे औषध वापरण्यास आपला विरोध असल्याचे केंद्र सरकारला पत्राच्या माध्यमातून कळवले असल्याची माहिती आएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्ण लोंढे यांनी दिली आहे.

ima maharashtra against use of coronil
कोरोनीलच्या वापराला आयएमए महाराष्ट्राचाही विरोध; केंद्राला पाठवले पत्र
author img

By

Published : Jun 5, 2021, 4:52 PM IST

मुंबई - रामदेवबाबा यांनी अलोपॅथीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. याचे पडसाद देशभर उमटले. दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने तर रामदेवबाबांविरोधात कडक भूमिका घेत थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होते. तसेच न्यायालयीन लढाईचीही तयारी दाखवली होती. असे असताना आता रामदेवबाबा आणि आयएमए यांच्यातील वाद पुन्हा पेटला आहे. हरियाणा आणि अन्य काही राज्यात कोरोना उपचार किटमध्ये रामदेवबाबांच्या कोरोनील औषधांचा समावेश करण्यात आला आहे. याला आयएमएने जोरदार विरोध केला आहे. या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता नसल्याचे म्हणत आयएमएने यावर आक्षेप घेतला आहे. तसे पत्र केंद्राला लिहिले आहे. तर महाराष्ट्र आयएमएनेही हे औषध वापरण्यास आपला विरोध असल्याचे केंद्र सरकारला पत्राच्या माध्यमातून कळवले असल्याची माहिती आएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्ण लोंढे यांनी दिली आहे.

दिल्लीत तक्रार दाखल -

'अलोपॅथी औषधांमुळेच अनेक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर लस घेऊनही मोठ्या संख्येने डॉक्टर मृत्युमुखी पडले आहेत. अलोपॅथी हे मूर्खाचे सायन्स आहे', अशी वादग्रस्त विधाने नुकतीच रामदेवबाबांनी केली होती. यावरुन रामदेवबाबा विरुद्ध आयएमए वाद पेटला होता. उत्तराखंड आयएमएने रामदेवबाबा विरोधात 1 हजार कोटींची दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. तर राष्ट्रीय आयएमएने दिल्लीत रामदेवबाबा विरोधात तक्रार दाखल केली आहे. तर याआधी ही अनेकदा रामदेवबाबाने डॉक्टरांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यामुळे रामदेवबाबा आणि आयएमएमध्ये नेहमीच वाद रंगतो. आता हा वाद आणखी पेटला आहे. त्यात कोरोनील औषधाला कोणतीही परवानगी नसताना त्याचा वापर काही ठिकाणी केला जात असल्याने आता आयएमए आणखी आक्रमक झाली आहे.

औषध परवाना रद्द करण्याची मागणी? -

आयएमए रामदेवबाबाविरोधात दंड थोपटून उभी आहेच. पण त्याचवेळी उत्तराखंड आयएमए रामदेवबाबा विरोधात अधिक आक्रमक झाली आहे. याअनुषंगाने उत्तराखंड आयएमएने रामदेवबाबा यांचा औषध परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे. तर आता महाराष्ट्र आयएमएनेही कोरोनीलच्या वापरावर आक्षेप घेतला आहे. कोरोनीलला महाराष्ट्रात परवानगी नाही. त्याचा वापर महाराष्ट्रात यापुढे होऊ दिला जाणार नाही. पण जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता नसलेल्या औषधाचा वापर देशात होत असल्याबद्दल डॉ लोंढे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकूणच आयएमए विरुद्ध रामदेवबाबा वाद दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे चित्र आहे.

हेही वाचा - अपरा एकादशी 2021: जाणून घ्या जल क्रीडा एकादशीचे शुभ मुहूर्त आणि त्याचे महत्व

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.