ETV Bharat / state

IIT Bombay Student Suicide SIT Probe: आयआयटीच्या दर्शन सोळंकी मृत्यू प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड

मुंबई आयआयटीमध्ये काही दिवसांपर्वी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. या आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचा तपास सोमवारी मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. दर्शन सोळंकी या विद्यार्थ्याचा 12 फेब्रुवारी रोजी आत्महत्या करून मृत्यू झाला होता. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी देखील दर्शन सोळंकीच्या मृत्यूची दखल घेत सार्वजनिक कर्यक्रमात चिंता व्यक्त केली होती.

IIT Bombay Student Suicide
IIT बॉम्बे विद्यार्थ्याची आत्महत्या
author img

By

Published : Feb 28, 2023, 9:24 AM IST

मुंबई : गुजरातमधील राहणारा आणि दलित समूहातून आलेला दर्शन सोळंकी याने 12 फेब्रुवारी रोजी वस्तीगृहात केली होती. यासंदर्भात विद्यार्थी संघटनांनी आणि त्याच्या पालकांनी हा जाती भेदभावामधून झालेला मृत्यू आहे, असा आरोप देखील केला होता. आता यासंदर्भात विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. आयआयटी मुंबई या ठिकाणी 12 फेब्रुवारी 2023 रोजी दर्शन सोळंकी या रशियन शास्त्र प्रथम वर्ष अभियांत्रिकी शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या वस्तीगृहात आत्महत्या केली आहे.

संस्थात्मक खून असल्याचा आरोप : उच्च शिक्षण संस्थांमध्ये दलित विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्यापाठीमागे जाती भेदभाव हे प्रकरण समोर आले. त्याचे कारण आयआयटी या ठिकाणी चार वर्षात अनिकेत अंभोरे आणि त्यानंतर आता दर्शन सोळुंके यांच्या या पद्धतीने आत्महत्या करण्यामागे जातीय भेदभावाचा सामना करावा लागला, हे खरे कारण असल्याचे दोघांच्याही कुटुंबांनी आरोप केला होता. विद्यार्थी संघटनांनी अनिकेत अंभोरेच्या मृत्यूनंतर संस्थात्मक खून असल्याचा आरोप केला.

विद्यार्थ्यांनी कॅंन्डल मार्च काढला : दोन वेळा कॅंन्डल मार्च काढला. पाच-सात दिवसापूर्वीच विद्यार्थ्यांनी पुन्हा मार्च काढून स्वतंत्र चौकशी करावी, आत्महत्या ही जातीय भेदभावातून झालेली आहे किंवा नाही याचा देखील तपास करावा, अशी मागणी केली होती. त्यामुळेच मुंबई संयुक्त पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे लखमी गौतम यांच्या पुढाकारांमध्येही विशेष तपास पथक स्थापन केलेले आहे. तसेच या पथकामध्ये शोध विभाग याचे डीसीपी के. उपाध्याय आणि एसीपी सांताक्रुज विभाग चंद्रकांत भोसले इतर सदस्य मिळून हे विशेष तपास करणार आहेत.

जातीय भेदभाव वागणूक : दर्शन सोळुंके याच्या मृत्यूनंतर त्याची बहीण, त्याची आई आणि वडील व काका यांनी दर्शनला या ठिकाणी जातीय भेदभाव वागणूक मिळाली होती, असे सांगितले. त्यामुळे त्याने पहिल्यांदा देखील असा प्रयत्न केला होता. त्यात तो यशस्वी झाला नव्हता. मात्र दुसऱ्यांदा हा त्याचा प्रयत्न यशस्वी झाला. आमच्यापासून त्याला काळाने हिरावून नेल्याचे म्हटले होते. दर्शन सोळंकीचे काका यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंधरा दिवसांपूर्वीच हा जातीय भेदभावातून संस्थात्मक खून झाल्याचे म्हटले होते. त्या रीतीने तपास करावा, अशी मागणी देखील केली होती.

जाती भेदभावाचा सामना : दर्शनाच्या मृत्युची पवई येथील पोलीस ठाण्यामध्ये अपघाती मृत्यू म्हणून त्याची नोंदही झालेली आहे. कुटुंबातील नातलगांनी त्याबाबत पोलीस स्थानकामध्ये निवेदन देखील दिलेली आहे. दर्शनचे वडील रमेश भाई सोळंकि यांनी त्यांच्या मोठ्या बहिणी जवळ सांगितले होते की, दर्शनला त्याच्या आयआयटी या शिक्षण संस्थेमध्ये जातीबाबत आजूबाजूचे काही लोक बोलतात, त्याला हिणवतात. त्याच्यामुळे तो निराश देखील झाला होता. त्याला जाती भेदभावाचा सामना करावा लागला होता, असे त्यांनी म्हटले होते.

हेही वाचा : IIT Bombay Student Suicide : आयआयटीमधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांबद्दल सरन्यायाधीशांनी केली चिंता व्यक्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.