मुंबई : यावर्षीचं भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक पियरे ऑगस्टनी, फ्रेनेक क्राऊझ आणि एने हुलीयर या तीन शास्त्रज्ञांना देण्यात येणार आहे. ६ ते १२ डिसेंबर दरम्यान स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथील रॉयल स्वीडश अकॅडमी ऑफ सायन्स येथे हा कार्यक्रम होईल.
आयआयटी प्राध्यापकाच्या संशोधनाची मदत : भौतिकशास्त्राच्या या तीन शास्त्रज्ञांनी 'इलेक्ट्रॉन डायनामिक इन मॅटर' यावर संशोधन केलं, ज्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिकानं गौरवण्यात आलं आहे. मात्र तुम्हाला हे जाणून अभिमान वाटेल की, त्यांच्या या संशोधनाला आयआयटी मुंबईच्या एका प्राध्यापकानं हातभार लावलाय! या नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांच्या संशोधनाला आयआयटी मुंबईचे प्राध्यापक गोपाल दीक्षित यांच्या भौतिकशास्त्रातील 'ऑटोसेकंड' या संशोधनाची मदत झाली आहे.
काय आहे ऑटोसेकंड : ऑटोसेकंड म्हणजे एका सेकंदाचा अब्जावा भाग, जो अतिसुक्ष्म आहे. जाणिवेच्या कैकपटीनं पलिकडचा हा काळ आहे. तो इलेक्ट्रॉन रुपात असतो. याला सोप्या शब्दात समजून घेऊया. कोणत्याही संगणकाचा स्पीड मेगा हर्ट्स मध्ये मोजला जातो. मैदानावर एखादा व्यक्ती एका सेकंदात किती चकरा मारतो, तो त्याचा स्पीड समजूया. एका सेकंदात जितक्या गतीनं इलेक्ट्रॉन इकडून तिकडे वाहतात, तितक्या गतीनं संगणकाचं प्रोसेसिंग होतं. याचे ऑटोसेकंड लेझर बनवण्यात येतात. त्याद्वारे इलेक्ट्रॉनच्या एका सेकंदाचा अब्जवा भाग मोजता येतो.
संगणकाचा स्पीड शंभर पटीनं वाढेल : या संदर्भात आयआयटी मुंबईचे प्राध्यापक गोपाल दीक्षित सांगतात, 'संगणकाची गती ट्रांजिस्टरवर अवलंबून असतं. तर ट्रांजिस्टर करंटवर अवलंबून असतो. करंट म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनचा समुच्चय. या इलेक्ट्रॉनमुळेच संगणकाच्या प्रोसेसिंगची गती निर्धारित होते. यामुळे आता संगणकाचा प्रोसेसिंग स्पीड आजच्यापेक्षा शंभर पटीनं वाढणार आहे. याचाच अर्थ, या आधी संगणकावर जेवढा डेटा ट्रान्सफर होण्यास चार तास लागायचे, तेवढा डेटा आता दहा सेकंदात ट्रान्सफर होईल. म्हणजेच आता संगणकाची गती गिगा हर्टझस वरून पेंटा हर्टझस पर्यंत जाईल. यामुळे नोबेलची शान भारताच्या मानानं वाढली आहे, असंच म्हणावं लागेल.
हेही वाचा :