मुंबई - तब्बल दीड वर्षांपासून कोरोनासोबत भारतासोबतच संपूर्ण जग लढत आहे. यापरिस्थितीत लवकरात लवकर लस उपलब्ध व्हावी ही अपेक्षा प्रत्येक जण करत असताना अखेर कोरोना प्रतिबंधक लस सरकारने उपलब्ध करुन दिली. या सर्व पार्श्वभूमीवर मोफत लस घेत असाल तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत करा, असे आवाहन देवतूत ग्रुपने केले आहे.
आपापल्या परीने मदत -
कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन लशी सध्या लाभार्थ्यांना दिल्या जात आहे. विशेष म्हणजे या लशी लाभार्थ्यांना सरकारी रुग्णालयात मोफत दिल्या जात आहेत. तर खासगी रुग्णालयात लसी घेण्यासाठी लाभार्थ्यांंना काही रक्कम मोजावी लागते. देवदूत या ग्रुपच्या सदस्यांनी सरकारकडून मिळणाऱ्या लसीचा स्वीकार तर केला आहे. मात्र, स्वीकार करत असताना सरकारला आपआपल्या परीने मदतही केली आहे.
हेही वाचा - ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून फायझर अस्ट्रॅाझेनेकाची माघार
देवदूत ग्रुपचे सदस्य आर. जी. हुले यांनी सांगितले की, कोविडच्या काळात सरकारी तिजोरीवर पडलेला भार लक्षात घेता जे लोक लसीचे पैसे देऊ शकतात त्यांनी त्या लशीची रक्कम मुख्यमंत्री सहय्यता निधीमध्ये जमा करावी. एका लशीची जरी रक्कम सरकारकडून जाहीर जरी केली नसली तरी आपण आपल्या परीने रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावी. विशेष म्हणजे देवदूत या ग्रुपमध्ये सगळे ज्येष्ठ नागरिक आहे.
तरुणांना आवाहन -
आर. जी. हुले म्हणाले की, या मोहिमेला यश देण्यासाठी तरुणांची आवश्यकता आहे. तरुणांनी जास्तीत जास्त समोर यावे, असे आवाहनही हुले यांनी केले आहे. कोरोनाच्या काळात 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरणाचं प्रयोजन आहे. लस घेतल्यानंतर जे पैसे देऊ शकतात अशा लाभार्थ्यांनी काही रक्कम जर मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पेैसे दिले तर या मोहिमेला नक्की यश येईल, असे हुले यांनी सांगितले.
हेही वाचा - 'सकारात्मकता हा तर मृत्यूचे आकडे लपवण्यासाठी मोदींनी केलेला PR स्टंट'