ETV Bharat / state

काळानुसार बदलले नाही तर गोष्टी बंद पडतात - उद्धव ठाकरे - Uddhav thakre in best bhavan mumbai

वाहतुककोंडीत मोठया बस चालवणे शक्य नाही. तिथे मिनी बसेस हा पर्याय आहे. काळानुसार बदलले नाही तर गोष्टी बंद पडतात, म्हणून बेस्टमध्ये बदल होत असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याप्रमाणे उध्दव यांनीही मंदीचे सावट असल्याचे मान्य केले. बेस्ट उपक्रमाअंतर्गत भाडेतत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या 6 मिनी एसी बसचा हस्तांतरण सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बेस्ट भवन येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई येथील बेस्ट भवनातील कार्यक्रमात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
author img

By

Published : Sep 17, 2019, 12:29 PM IST

मुंबई - वाहतुककोंडीत मोठया बस चालवणे शक्य नाही. तिथे मिनी बसेस हा पर्याय आहे. काळानुसार बदलले नाही तर गोष्टी बंद पडतात, म्हणून बेस्टमध्ये बदल होत असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याप्रमाणे उध्दव यांनीही मंदीचे सावट असल्याचे मान्य केले. बेस्ट उपक्रमाअंतर्गत भाडेतत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या 6 मिनी एसी बसचा हस्तांतरण सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बेस्ट भवन येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई येथील बेस्ट भवनातील कार्यक्रमात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

हेही वाचा - भिडेंसह इतर आरोपींच्या विरोधात ११ नोव्हेंबरपर्यंत आरोपपत्र दाखल करा - मुंबई उच्च न्यायालय

मंदीचे सावट असतानाही एकाही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ओला उबेरमुळे वाहन उद्योगाला फटका बसला असल्याचे म्हटले होते. तसाच विपरित परिणाण बेस्टलाही बसल्याचे उध्दव ठाकरे म्हणाले आहेत. ओला-उबेर शत्रू नाही पण तिकडे जाणारा प्रवासी आता पुन्हा बेस्टकडे वळत असल्याचे ते म्हणाले. याचवेळी बेस्ट उपक्रमाअंतर्गत भाडेतत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या 6 मिनी एसी बसचा हस्तांतरण सोहळाही ठाकरे यांच्या हस्ते पार पडला.

हेही वाचा - जीडीपी ५ टक्क्यांवर जाणे आश्चर्यकारक, मात्र अर्थव्यवस्था लवकरच पूर्वपदावर येईल - शक्तीकांत दास

आज येथे राज बसले आहेत असा स्पेस घेत पुढे पुरोहित बसल्याचे उध्दव यांनी म्हटले आणि सभागृहात एकच हशा पिकला. बेस्टमध्ये युती आहे तशीच सगळीकडे युती असल्याचे उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

बेस्टच्या ताफ्यात जानेवारीपर्यंत 1 हजार मिडी एसी बस दाखल होणार -

बेस्टच्या ताफ्यात जानेवारीपर्यंत 1 हजार मिडी एसी बस टप्प्याटप्प्याने दाखल होणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे संचालक सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिली. नवीन भाडेतत्त्वावरील मिडी एसी बसचे चालक ऑपरेटर हे कंत्राटदाराकडून नेमण्यात आले आहे. बेस्टचा मार्ग व भाडे बेस्ट निश्चित करणार आहे. तसेच या बसची देखील बेस्ट ऍपवर माहिती मिळेल.

300 मिडी एसी बसचे कंत्राट काढण्यात येणार आहे. तर मार्चपर्यंत त्या बेस्टच्या ताफ्यात दाखल होतील. तसेच 6 हजार बेस्टचा मानस आहे. तर बेस्ट भाडे कमी केल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत 10 लाख प्रवासी वाढ झाली आहे. याबरोबरच बेस्टवरचा तोटा दूर करण्यासाठी भाडेतत्वावर बस चालवण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सांगितले.

हेही वाचा - हर्षवर्धन जाधवांचा 'शिवस्वराज्य बहुजन पक्ष' विधानसभेच्या 6 जागा लढवणार

Intro:मुंबईतील वाहतुककोंडीत मोठया बस चालवणं शक्य नाही तिथे मिनी बसेस हा पर्याय आहे. काळानुसार बदलायला पाहिजे नाहीतर गोष्टी बंद पडतात, म्हणून बेस्ट मध्ये बदल होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी मंदीच सावट असल्याचे मान्य केलं आहे. बेस्ट उपक्रमाअंतर्गत भाडेतत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या 6 मिनी एसी बसचा हस्तांतरण सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बेस्ट भवन येथे पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.Body:मंदीच सावट असतानाही एकाही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही. केंद्रीय मंत्री सीतारामन यांनी ओला उबेरमुळे व्हॅन उद्योगाला फटका पडला असल्याचे म्हटले तसा फटका बेस्टलाही बसल्याचे उध्दव ठाकरे म्हणाले. ओला उबेर शत्रू नाही पण तिकडे जाणारा प्रवासी आता पुन्हा बेस्ट कडे वळत असल्याचे ते म्हणाले.
आज येथे राज बसले आहेत असा स्पेस घेत पुढे पुरोहित बसल्याचे उध्दव यांनी म्हटले आणि सभागृहात एकच हशा पिकला. बेस्टमध्ये युती आहे तशीच सगळीकडे युती असल्याचे उध्दव ठाकरे यांनी सांगितले. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.