मुंबई : उच्च न्यायालयात महिलेने दाखल केलेल्या रिट याचिकेवर सुनावणी सुरु होती. ज्यामध्ये तिने केस पुण्याहून पनवेलला हलवण्यात यावी अशी विनंती केली होती. सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी पुण्याला जाणे गैरसोयीचे आहे. महिला आर्थिक उत्पन्नासाठी तिच्या पालकांवर अवलंबून आहे. त्यामुळे हस्तांतरणाची मागणी महिलेने केली आहे. तसेच पुण्यातील कोणत्याही वकिलाशी आपला परिचय नसल्याचेही तिने सांगितले. त्यामुळे खटला पनवेलमधील न्यायालयात वर्ग करावा अशी विनंती महिलेने उच्च न्यायालयात केली आहे. उच्च न्यायालयाने महिलेची मागणी मान्य करीत महिलेला तिच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही असे निरिक्षण नोंदवले आहे.
पनवेलला जाणे गैरसोयीचे : पतीने दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, अर्जदार काम करत असताना ती पुण्याला जात होती. तसेच तिने भारतातील विविध राज्यांमध्ये, मलेशियामध्येही प्रवास केला असल्याचा युक्तीवाद केला. पुण्यात आईची काळजी घ्यावी लागत असल्याने पनवेलला जाणे गैरसोयीचे असल्याचा युक्तीवाद पतीच्या वकिलांनी न्यायालयात केला. यावर पतीती मागणी न्यायालयाने फेटाळुन लावत पतीला दिलेल्या तारखेला हजर राहण्याचे निर्देश दिली आहेत. तसेच न्यायालयात ठराविक कालावधित अर्ज करण्याची पतीची विनंती न्यायालयाने मान्य केली आहे.
पत्नीच्या सोयीचा विचार : यावर न्यायालयाने निरिक्षण नोंदवले आहे की, हस्तांतरणाच्या अर्जावर निर्णय घेताना पत्नीच्या सोयीचा विचार करणे आवश्यक आहे. यावेळी पतीने केलेली मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे की, सध्याच्या खटल्यातील तथ्य पाहता अर्जदार पनवेल येथे राहते. त्यामुळे अर्जदाराला पुण्याहून पनवेलला बदली करण्याची मागणी करण्यापासून वंचित करता येत नाही.
फौजदारी न्यायालयात अर्ज करण्याची मुभा : बदलीच्या अर्जावर विचार करताना महिला अर्जदाराला अडचण येणार नाही याची काळजी घ्याची असते. अर्जदार पनवेल येथे राहते असल्याने तिला पुण्याला जाणे गैरसोयीचे होईल. पतीने पनवेल येथील फौजदारी न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या कार्यवाहीस उपस्थित राहणे आवश्यक आहे. दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ विभाग पनवेल यांनी ठरवून दिलेल्या दिवशी फौजदारी न्यायालयात अर्ज दाखल करण्याची मुभा पतीली दिली आहे.
सर्वसाधारणपणे कोणत्याही खटल्यात महिलेच्या सोईची बाब पाहण्याचे निर्देश यापूर्वीही अनेक खटल्यांच्या निमित्ताने वेळोवेळी सर्वच कोर्टांनी दिले आहेत. त्याचाच स्वाभाविक प्रत्यय या खटल्यातूनही येत आहे.
हेही वाचा - Mughal Garden Renamed : राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नाव बदलले.. आता अमृत उद्यान दिले नाव