ETV Bharat / state

जितेगा भाई जितेगा, इंडिया वर्ल्डकप जितेगा; भारत वर्ल्डकप जिंकावा यासाठी मुंबईत यज्ञाचं आयोजन - इंडिया वर्ल्डकप जितेगा

ICC World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023चा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या ICC World Cup 2023 : नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. भारताने वर्ल्डकप जिंकावा, यासाठी देशभरात प्रार्थना केली जात आहे. तर आज मुंबईत देखील भारतानं वर्ल्डकप जिंकावा यासाठी यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं.

ICC World Cup 2023
भारत वर्ल्डकप जिंकावा यासाठी मुंबईत यज्ञाचे आयोजन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 18, 2023, 6:38 PM IST

भारत वर्ल्डकप जिंकावा यासाठी मुंबईत यज्ञ

मुंबई ICC World Cup 2023 : सध्या भारतात क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरू असल्यानं देशात क्रिकेटमय वातावरण झालं आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं अभूतपूर्व कामगिरी करत, तब्बल 10 सामने जिंकत, अंतिम फेरीत धडक मारली आहे. दरम्यान, उद्या अंतिम फेरीतील सामना ऑस्ट्रेलियासोबत अहमदाबाद येथे होणार आहे. उद्याचा सामना जिंकून भारताने विश्वचषक जिंकावा, असं प्रत्येक भारतवासीयांची इच्छा आहे. भारताने वर्ल्डकप जिंकावा, (World Cup 2023) यासाठी विविध ठिकाणी यज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे.

माहिती देताना प्रतिनिधी

वर्ल्डकप जिंकावा यासाठी यज्ञ : वर्ल्डकप भारताने जिंकावा यासाठी मुंबई भाजपाचे नेते अतुल शहा यांनी यज्ञाचं आयोजन केलं होतं. यावेळी मोठ्या प्रमाणात क्रिकेटप्रेमी (Cricket Fans) उपस्थित होते. तसंच अनेक पंडितांना देखील या यज्ञासाठी पाचारण करण्यात आलं होतं. यावेळी भारतीय क्रिकेट संघाचे मोठमोठे पोस्टर्स, तिरंगे लावण्यात आले होते. तसंच यज्ञाच्या वेळी विधी व पूजा करून होम हवन करण्यात आलं. यादरम्यान मंत्रोच्चार करून भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छा देण्यात आल्या. तसंच भारतीय क्रिकेट संघ उत्तम कामगिरी करत आहेत. संघातील विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma), शुभमन गिल, मोहम्मद शमी हे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळं उद्या भारत वर्ल्डकप जिंकणारच, यासाठी यज्ञाचं आयोजन केलं असल्याचं भाजपा नेते अतुल शाह यांनी म्हटलं आहे.

घोषणाबाजीने परिसर दुमदुमला : यज्ञासाठी क्रिकेटप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या क्रिकेटप्रेमींनी उद्याच्या सामन्यासाठी भारतीय संघाला शुभेच्छा देत घोषणाबाजी केली. जितेगा भाई जितेगा... इंडिया जितेगा...भारत माता की जय...वंदे मातरम्... अशा घोषणा क्रिकेटप्रेमींनी दिल्या. उद्या आपली भारतीय क्रिकेट टीम वर्ल्डकप जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा -

  1. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्व 'विश्वविजेते' कर्णधार राहणार उपस्थित; 'शेजारी' मात्र अनुपस्थित राहण्याची शक्यता
  2. जगात भारी कोल्हापुरी! विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर चमकणार कोल्हापूरचा 'लेझर शो'
  3. ऑस्ट्रेलियाच नॉकआऊट सामन्यांचा 'दादा'! कांगारूंमुळे अनेकदा मोडलं भारताचं विश्वचषकाचं स्वप्न

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.