मुंबई - पक्षाने सांगितल्यास पाकिस्तानच्या सीमेवर जावून सुध्दा निवडणूक लढवेल. वरळी मतदारसंघ आदित्य ठाकरेंना दिल्याने बोरिवली मतदारसंघातून मला संधी देण्यात आली, असे विधान बोरिवलीतील भाजपचे उमेदवार सुनील राणे यांनी केले.
नरेंद्र मोदींच्या कल्पनेतील आदर्श भारताचे प्रतिबिंब येत्या 21 तारखेला बोरिवलीत उमटेल. विधानसभेची निवडणूक ही पक्षाच्या धारेवर असते. पक्ष ठरवतो कोणी कुठून निवडणूक लढवायची. अनेक उमेदवार आपले मतदार संघ सोडून दुसरीकडे निवडणूक लढवत असतात, असे ही सुनील राणे म्हणाले.
हेही वाचा - आघाडीच्या काळात मुंबईवर दहशतवादी हल्ले, बीकेसी येथील सभेत नरेंद्र मोदींची टीका
2014 साली राणे भाजपच्या वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढले होते. या निवडणुकीत बोरीवलीकर राणेंना आपला कौल देणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.