ETV Bharat / state

अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला

चक्रीवादळाच्या जवळ असलेला समुद्र अधिक खवळलेला राहील, तर किनारपट्टीजवळ समुद्र काही प्रमाणात खवळलेला दिसेल. या दरम्यान कोकणासह मुंबईमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सुरक्षितेसाठी मच्छिमारांनी ११ व १२ जूनला अरबी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

author img

By

Published : Jun 9, 2019, 9:03 PM IST

Updated : Jun 9, 2019, 9:14 PM IST

मुंबई - भारताच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ असलेल्या अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ११ व १२ जून दरम्यान हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे ३०० किलोमीटर दूर राहील. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याने दिला.

हे चक्रीवादळ राज्यात धडकण्याची शक्यता नाही, परंतु त्याच्या प्रभावामुळे या भागातील किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढणार आहे. चक्रीवादळाच्या जवळ असलेला समुद्र अधिक खवळलेला राहील, तर किनारपट्टीजवळ समुद्र काही प्रमाणात खवळलेला दिसेल. या दरम्यान कोकणासह मुंबईमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सुरक्षितेसाठी मच्छिमारांनी ११ व १२ जूनला अरबी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Intro:Body:MH_MUM_Monsoon_Advisary_7204684

अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत
११ व १२ जून रोजी मासेमारांनी समुद्रात जाऊ नये

मुंबई:
भारताच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ असलेल्या अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ११ व १२ जून दरम्यान हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे ३०० किलोमीटर दूर राहील.
हे चक्रीवादळ राज्यात धडकण्याची शक्यता नाही, परंतु त्याच्या प्रभावामुळे या कालखंडात किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढलेला दिसेल. चक्रीवादळाच्या जवळ असलेला समुद्र अधिक खवळलेला राहील, तर किनारपट्टीजवळ समुद्र काही प्रमाणात खवळलेला दिसेल. या दरम्यान कोकणासह मुंबईमध्ये पावसाच्या सरी कोसळतील, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सुरक्षितेसाठी मासेमारांनी ११ व १२ जून रोजी अरबी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.Conclusion:
Last Updated : Jun 9, 2019, 9:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.